सरपंच पद आरक्षण रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:31+5:302020-12-16T04:33:31+5:30
हिमायतनगर : सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिमायतनगरातील ५२ ग्रामपंचायतीमधील इच्छुक सरपंच पदाच्या दावेदार उमेदवारांचा हिरमोड, सरपंच पद ...
हिमायतनगर : सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिमायतनगरातील ५२ ग्रामपंचायतीमधील इच्छुक सरपंच पदाच्या दावेदार उमेदवारांचा हिरमोड, सरपंच पद इच्छुक असणारे उमेदवार घरोघरी फिरून भेटीगाठी वाढवल्या होत्या. पुढील सरपंच आपणच असणार या तो-र्यात पुढारी वावरत होते.
मागील काळात हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडूणूका तीन टप्यात पार पडल्या होत्या. मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासकाची नेमणूक केली होती. आजघडीला हिमायतनगर तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायतीपैकी ५० ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे.
मुदत संपल्याने आता २०२५ ते २०२५ या पाच वर्षांसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. ११ रोजी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १४ रोजी ग्रामविकास मंत्रालय विभागाने सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रमही पुढे ढकलल्याने ग्रामपंचायत निवडणूक मतदान १५ जानेवारी झाल्याच्या नंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.
हिमायतनगर तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाचे सदर आरक्षण सोडत पार पडली होती. हिमायतनगर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिला, पुरूष ७ पद, अनुसूचित जमाती महीला पुरूष एकूण ८, ओबीसी महिला, पुरूष एकूण १४, सर्वसाधारण महिला पुरूष २३ असे एकूण ५२ सरपंच पद आरक्षण सोडत झाली होती. आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडल्यानंतर अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून, सरपंचपद आरक्षित असलेल्या गावातील इच्छुक उमेदवार यानी भेटीगाठींवर भर देऊन पुढील सरपंच आपणच असणार या तोर्यात पुढारी वावरत असल्याचे चित्र निर्माण झाले होते आणि लढतींना विशेष महत्त्व येणार होते. पण आता तसेही चित्र असणार नाही. आता सरपंच पद आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडूनक पार पडल्यावर सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार असल्याने आता गावात अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. एसी, एसटी, ओबीसी, सर्वसाधारणसाठी सरपंच पदाचे आरक्षण सुटलेल्या गावातील प्रवर्गाची चिंता वाढली आहे. अनेक वर्षांपासून या प्रवर्गासाठी आरक्षण सुटले या ठिकाणी पुढील सोडतीत अन्याय होणार की काय या चिंतेत वाढ झाली आहे.