सावरगावचा तलाव फुटला, पिके गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:08+5:302021-09-10T04:25:08+5:30

तालुक्यात सावरगाव पी. व वाडी शिवारात मोठे पाझर तलाव होते. या तलावावरच सावरगाव पी. सावरगाव वाडी, प्रभुनगर तांडा, भनकुबाई ...

Savargaon lake burst, crops were carried away | सावरगावचा तलाव फुटला, पिके गेली वाहून

सावरगावचा तलाव फुटला, पिके गेली वाहून

Next

तालुक्यात सावरगाव पी. व वाडी शिवारात मोठे पाझर तलाव होते. या तलावावरच सावरगाव पी. सावरगाव वाडी, प्रभुनगर तांडा, भनकुबाई तांडा व तलावाच्या खालील बाजूस असलेल्या मंग्याळ गावांचा पाण्याचा पुरवठा याच तलावावर अवलंबून होता; पण दि.६ सप्टेंबर व दि.७ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव पाळूच्या मध्यभागातूनच फुटला. यात सर्व पाणी वाहून गेले. यामुळे जीवित हानी नसली तरी पिकांचे व जमिनीचे मोठे नुकसान झाले. जमीन बुडातूनच खरडुन गेली असून दि. ८ रोजी तहसीलदार काशीनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, काँग्रेसचे प्रदेश सचिव डाॅक्टर श्रावण रॅपनवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर जिल्हा परिषद सदस्य प्र. संतोष बोनलेवाड, शिवसेनेचे गंगाधर पिटलेवाड, नागनाथ पाटील, माजी सरपंच शौकतखान पठाण, मंग्याळचे सरपंच काटशेव हे तलावाची व नुकसानीच्या पाहणीसाठी आले असता सरपंच मुजाहिद इनामदार, उपसरपंच एजाज मुजावर वाडीचे सरपंच प्रतिनिधी बालाजी गुट्टे व गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांना लोखी निवेदन दिले. काही शेतकऱ्यांनी तळ्याच्या पाळूला आडवा बोर मारले, पाळूत पाइप पुरून पाणी घेतले यामुळेच तळ्याच्या पाळू कमकुवत होऊन तलाव फुटल्याची तक्रार उपस्थित नागरिकांनी केली.

Web Title: Savargaon lake burst, crops were carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.