सावरगाव पी व जांब बु.प्रा.आ. केंद्राच्या रुग्वाणहिकेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:53+5:302021-05-06T04:18:53+5:30
वानोळा दलित वस्तीत दोन हायमास्ट पथदिवे माहूर : वानोळा ग्रामपंचायत हद्दीतील वानोळा गाव व तांडा येथे जिल्हा परिषद ...
वानोळा दलित वस्तीत
दोन हायमास्ट पथदिवे
माहूर : वानोळा ग्रामपंचायत हद्दीतील वानोळा गाव व तांडा येथे जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड यांच्या पुढाकारातून दोन लाख ९९ हजार रुपयांचा निधी खर्च करत दलित वस्तीमध्ये दोन हायमास्ट पथदिवे उभारण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून ग्रामस्थांची ही हायमास्ट पथदिव्यांची मागणी होती. त्यानुसार सरपंच डॉ.रविकुमार मेंडके यांच्या मार्गदर्शनात गावात हायमास्ट उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी संजय राठोड यांच्यासह सरपंच डॉ. रविकुमार मेंडके यांचे आभार मानले. यावेळी सरपंच डॉ.रविकुमार मेंडके, उपसरपंच सुरेश राठोड, माजी उपसरपंच अभिजित राठोड, तारासिंग चव्हाण, मारुती पांडे, सुनीता सिडाम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संभाजी भिलवंडे यांनी केली
गृहविलगीकरणात कोरोनावर यशस्वी मात
नरसीफाटा : डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन केले तर कोरोनासारख्या गंभीर आजारावर लीलया मात केली जाऊ शकते. याचे उत्तम उदाहरण नायगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी घालून दिले. त्यांनी सहकुटुंब गृहविलगीकरणात राहून कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
१४ एप्रिल रोजी संभाजी भिलवंडे यांना कोरोनाची लागण झाली. एक-दोन दिवसातच त्यांच्या पत्नी रंजनाताई भिलवंडे, मुलगा हर्षल व पुतण्या सत्यजित भिलवंडे यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच अनेकजण भयग्रस्त होतात. भीतीबरोबरच अज्ञानामुळे आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे, तर काहींनी स्वहस्ते जीवनयात्रा संपविली आहे. जे दृढनिश्चयी होते त्यांनी कोरोनावर सहजतेने मात केली आहे. संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच भिलवंडे अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी अत्यंत संयमाने डॉ. विश्वास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालन, डॉ. अनिस शेख यांचे मार्गदर्शन घेतले.
घरातच विलगीकरण कक्षात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या आणि औषधे घेतली. त्याचबरोबर हळद घालून गरम केलेले गरम पाणी, पाण्याची वाफ घेतली. योग्य आहार घेऊन ते आणि त्यांचे कुटुंब आता कोरोनामुक्त झाले. कोरोना झाला तर घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी, योग्य आहार व व्यायाम केला तर कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर सहज मात केली जाऊ शकते, असे भिलवंडे यांनी सांगितले.
मन्याड नदीवरील पुलाचे भूमिपूजन
मुखेड : मुखेड-कंधार दोन तालुक्यांना जोडणारा अतिशय नजीकचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या नारनाळी गावाजवळील मन्याड नदीवरील पुलाचे बांधकाम स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरू झाले असून, आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले. या पुलाच्या बांधकामानंतर मुखेड तालुक्यातून कंधार तालुक्यात जाण्यासाठी अतिशय जवळचा मार्ग कार्यान्वित होणार आहे.
यावेळी कृउबा सभापती खुशाल पाटील उमरदरीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर वीरभद्र हिमगिरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड, भाजप शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, सुधीर चव्हाण उपस्थित होते. आमदार डाॅ. तुषार राठोड यांनी या पुलासाठी पाठपुरावा करून मंजुरी मिळून आणावी यासाठी नारनाळी व कार्ला या गावातील नागरिकांनी त्यांना साकडे घातले होते. गावचे सरपंच भुजंग देहारे, उपसरपंच माधव उलगुलवाड, ग्रामपंचायत सदस्य विकास रायवडे, गणेश बीरू, रघुनाथ यमुलवाड, पोलीसपाटील शिवाजी बांदेवाड, उमेश अडकीने, हणमथ अडकीने, नारायण सोमवरे, किसन धाडेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.