तीन महिन्यातच घोटाळा, तरीही तीन वर्षे ठेका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:32+5:302021-06-27T04:13:32+5:30
या सर्व धान्य घोटाळा प्रक्रियेत ठेकेदार पारसेवारची धान्य वाहतुकीची मुदत फेब्रुवारी २०२१मध्ये समाप्त झाली. मात्र पुन्हा पर्यायी धान्य ...
या सर्व धान्य घोटाळा प्रक्रियेत ठेकेदार पारसेवारची धान्य वाहतुकीची मुदत फेब्रुवारी २०२१मध्ये समाप्त झाली. मात्र पुन्हा पर्यायी धान्य वाहतुकीची व्यवस्था झाली नसल्याने पारसेवारलाच धान्य वाहतूक करण्यास दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ती मुदतही आता संपली असून धान्य वाहतुकीच्या निविदा राज्यस्तरावर प्रसिद्ध झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या निविदा तांत्रिक तपासणीमध्ये आहेत. त्यानंतर दराचे लिफाफे उघडले जातील.
चौकट------------
कोरोना काळात केली अतिरिक्त धान्य वाहतूक
कोरोनाच्या दोन्ही लाटेत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप करण्यात आले. या अतिरिक्त धान्याची वाहतूकही या ठेकेदारानेच केली. यातूनही कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्यात आली. जिल्ह्यातील धान्य वाहतुकीत लाखों क्विंटल धान्यही व्यपगत झाले. त्याची रक्कमही ठेकेदाराकडे थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.