नांदेडमधील शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:24 AM2018-06-27T00:24:03+5:302018-06-27T00:25:24+5:30

अवघ्या पाच व्हेंटीलेटरवरच रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास दिला जातो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना अम्बूबॅगवरच अवलंबून रहावे लागते़ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण खात्याला कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़

The scarcity of ventilator in a government hospital in Nanded | नांदेडमधील शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरचा तुटवडा

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरचा तुटवडा

Next
ठळक मुद्देअम्बूबॅगवरच भिस्त : कृत्रिम श्वाच्छोश्वासासाठी करावी लागतेय कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवत आहे़ अवघ्या पाच व्हेंटीलेटरवरच रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास दिला जातो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना अम्बूबॅगवरच अवलंबून रहावे लागते़ प्रशासनाने याबाबत वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण खात्याला कळवूनही त्याची दखल घेण्यात आली नाही़
शासकीय रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ व शेजारील तेलंगणातून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण येतात़ रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागावरही मोठा ताण असतो़ परंतु, त्या तुलनेत रुग्णालयात कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही़ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्याही मोजकीच आहे़ त्यामुळे कार्यरत कर्मचारी आणि डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडतो़ अपघात व इतर आजारांच्या अत्यवस्थ रुग्णांचीही संख्या मोठी असते़ या रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोश्वास देणे गरजेचे असते़ परंतु, गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात व्हेंटीलेटरची संख्या मोजकीच आहे़ पाचच व्हेंटीलेटरवर कृत्रिम श्वाच्छोश्वास देण्यात येतो़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढल्यास अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना ऐनवेळी गरजेनुसार एका रुग्णाचे व्हेंटीलेटर काढून दुसºया रुग्णाला लावण्याची कसरत करावी लागते़ ही कसरत जोखमीचीही ठरु शकते़ त्यामुळे इतरवेळी अत्यवस्थ रुग्णांना अम्बूबॅगद्वारेच श्वाच्छोश्वास दिला जातो़
ही अम्बूबॅग नातेवाईकांच्या हाती असते़ ठरावीक वेळेला त्या अम्बूबॅगला दाब देणे गरजेचे असते़ त्यामुळे यामध्ये नातेवाईकांकडून हलगर्जी झाल्यास रुग्णांच्या जिवावरही बेतू शकते़ व्हेंटीलेटरच्या तुटवड्याबाबत प्रशासनाने यापूर्वी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे़ परंतु ,अद्यापही वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्याचा पुरवठा करण्यात आला नाही़ सिद्धीविनायक ट्रस्टकडून व्हेंटीलेटरचा पुरवठा करण्यात येणार होता़ मात्र सध्या तो विषयही प्रलंबितच आहे़ त्यामुळे गंभीर विषयाकडे आता लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे़
---
व्हेंटीलेटरच्या तुटवड्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याशी चर्चा झाली आहे़ वरिष्ठ कार्यालय किंवा सिद्धीविनायक ट्रस्टकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे़ व्हेंटीलेटरसाठी प्रयत्न करीत असल्याचे अधिष्ठाता म्हणाले़

Web Title: The scarcity of ventilator in a government hospital in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.