महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:30 IST2024-12-04T16:22:54+5:302024-12-04T17:30:47+5:30
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने समाजबांधवांच्या सुविधेसाठी आदिलाबाद ते दादर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक
नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने समाजबांधव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबई गाठतात. राज्यभरातून याठिकाणी समाजबांधव मोठ्या संख्येने दाखल होतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने समाजबांधवांच्या सुविधेसाठी आदिलाबाद ते दादर महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक (०७०५८) आदिलाबाद ते दादर ही गाडी ५ डिसेंबर रोजी रवाना होईल, तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक (०७०५७) दादर-आदिलाबाद ही गाडी ७ डिसेंबर रोजी दादरवरून सुटेल. १४ डब्यांच्या या स्पेशल ट्रेनचे सर्वच डबे अनारक्षित राहतील. ५ डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी सात वाजता ही गाडी (०७०५८) आदिलाबाद स्थानाकावरून प्रस्थान करेल, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता दादर स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक (०७०५७) ही गाडी ७ डिसेंबर रोजी पहाटे १:०५ वाजता दादर स्थानाकवरून सुटेल, तर त्याच दिवशी सायंकाळी ६:४५ वाजता आदिलाबाद येथे पोहोचेल.
सर्व थांबे घेणार
५ डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजता ही गाडी नांदेड स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर ११. ४५ वा पूर्णा, १२. २५ वा परभणी, १. १५ वा मानवत रोड, १. ४२ सेलू, २. ३० परतूर, ३. ३० वा जालना, तर ४. ४५ वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर गाडी पोहचेल. तर ७ डिसेंबर रोजी परतणारी गाडी दुपारी दोन वाजता नांदेडला पोहोचेल.