दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:01+5:302021-06-30T04:13:01+5:30
नांदेड जिल्ह्यात एकूण ४३ हजार ६१२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार होते; परंतु त्यांना आज परीक्षांना सामोरे न जाता उत्तीर्ण ...
नांदेड जिल्ह्यात एकूण ४३ हजार ६१२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार होते; परंतु त्यांना आज परीक्षांना सामोरे न जाता उत्तीर्ण केले जाणार असून यामध्ये २२ हजार ३९९ मुले आणि २१ हजार २१३ मुलींचा समावेश आहे. सदर विद्यार्थ्यांना गुणदान करण्याची पद्धत शिक्षण विभागाने ठरवून दिली असून त्यासाठी मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली शाळास्तरावर एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली सध्या गुणदानाबरोबरच निकाल पूर्ण करण्याची कामे सुरू आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचे अधिकार समितीस आहेत. त्याचबरोबर मूल्यापन प्रक्रिया ऑनलाइन असल्याने सदर डाटा थेट बोर्डाकडे नोंद होत आहे. त्यामुळे नेमक्या किती शाळांनी आजपर्यंत काय केले, हे सांगता येणार नाही; परंतु अंदाजित ७५ टक्के शाळांनी निकालाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड.
दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण कोणत्या पद्धतीने द्यायचे आहेत, त्याचे ८० - २० चे सूत्र ठरवून दिले आहे. त्यानुसार काम सुरू आहे; परंतु बहुतांश विद्यार्थ्यांचे इयत्ता नववीचे गुणपत्रक नसल्याने काही प्रमाणात अडचणी येत आहेत.
- डाॅ. डब्ल्यू. एच. शेख, मुख्याध्यापक, अर्धापूर.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुण मूल्यमापनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शिक्षण विभागाने घालून दिलेल्या नियमानुसार गुणदान प्रक्रिया समितीने राबविली आहे.
- बालाजी थोटवे, मुख्याध्यापक.