नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनीना आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 07:49 PM2018-08-02T19:49:48+5:302018-08-02T19:50:57+5:30

जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़

School students affected by protester in Nanded district | नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनीना आंदोलनाचा फटका

नांदेड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनीना आंदोलनाचा फटका

googlenewsNext

नांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़

उत्पन्नाचा निर्देशांक कमी असलेल्या नांदेड जिल्हयातील लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी, मुदखेड, भोकर, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी बससेवा सुरु करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील ३७५ गावातील ६ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी या बससेवेचा लाभ घेतात़ जिल्ह्यात २३ जुलै पासून सुरु झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आह़े  त्याचवेळी  या ३७५ गावातील साडेसहा हजाराहुन अधिक विद्यार्थ्यांनीही शाळेत जावू शकल्या नाहीत़ मागील तीन-चार दिवसांपासून बससेवा सुरु केली जात आहे़ त्यातही उमरी तालुक्यात मात्र अद्यापही बससेवा सुरु करण्यास पोलिस प्रशासनाने परवानगी दिली नाही़ त्यामुळे उमरी तालुक्यातील ३८ गावच्या साडेसातशे विद्यार्थ्यानी शाळेपासून वंचितच आहेत़

जिल्ह्यात सर्वाधिक भोकर तालुक्यातील १ हजार १४६ विद्यार्थींनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत बससेवेचा लाभ घेतात़ त्या खालोखाल देगलूर तालुक्यात १ हजार ८५, मुदखेड तालुक्यात ८३४, किनवट तालुक्यात ८१५, लोहा तालुक्यात ६१५, हिमायतनगर तालुक्यात ५१५, बिलोली तालुक्यात ४०६, धर्माबाद तालुक्यात ६२० विद्यार्थींनी लाभ घेत आहेत़ २३४ शाळामध्ये या विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत़ 

जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससची जाळपोळ तसेच तोडफोडही करण्यात आली़ उमरी तालुक्याततर विद्यार्थींनी बसमध्ये असतांनाही दगडफेकीची घटना घडली़ या बाबीची तात्काळ दखल घेत विद्यार्थींनीना सुरक्षितपणे जाता यावे, याची खबरदारी संबंधीत आगार प्रमुखांनी प्राधान्यांने घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर यांनी दिले आहेत़ त्याचवेळी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थींनीसाठी असलेली निळी बस उपलब्ध नसेल तर इतर बस उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी डोंगर यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत़

Web Title: School students affected by protester in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.