शालेय पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:02+5:302021-05-03T04:13:02+5:30
गतवर्षी शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी ...
गतवर्षी शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी २०१९- २० व २०२०- २०२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर करण्यात येणार आहे.
चौकट- पर्यावरण संवर्धन व कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी वापरलेली पुस्तके पालकांनी मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आणून द्यावी. - व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड.
चौकट- विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर प्रकल्पासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावा. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या पाल्याने वापरलेली पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील, यासाठी सहकार्य करावे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड.
चाैकट-जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी संख्या १ लाख ९६ हजार ८१५ असून इयत्ता पहिलीत -३१,८००, दुसरी-३३२८६, तिसरी-३३१९१, चौथी-३३२२७, पाचवी-२३४५५, सहावी- १७९४२, सातवी- १६८४७, आठवी-७०६७ विद्यार्थी संख्या आहे.