आजपासून विद्यार्थ्यांविना भरणार शाळा; ऑनलाईन गृहभेटीच्‍या माध्‍यमातून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:20+5:302021-06-16T04:25:20+5:30

जिल्ह्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावण्यास सध्या सूचना नाहीत. त्यामुळे शाळेत विद्यार्थी येणार ...

Schools to be filled without students from today; Education through online home visits | आजपासून विद्यार्थ्यांविना भरणार शाळा; ऑनलाईन गृहभेटीच्‍या माध्‍यमातून शिक्षण

आजपासून विद्यार्थ्यांविना भरणार शाळा; ऑनलाईन गृहभेटीच्‍या माध्‍यमातून शिक्षण

Next

जिल्ह्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावण्यास सध्या सूचना नाहीत. त्यामुळे शाळेत विद्यार्थी येणार नाहीत; परंतु सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी सूचना जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तांची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील व त्यांचे ऑनलाईन माध्यमातून, तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व उपक्रमद्वारे शिक्षण सुरू ठेवावेत. तसेच दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व वर्गांच्या अध्यापनासाठीचे वेळापत्रक तयार केलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील व अभ्यासक्रम पूर्ण करतील यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी केले.

माझी शाळा सुंदर शाळा, वृक्षारोपण यांसह शालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होईल, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच गोष्टींचा शनिवार या उपक्रमातून वाचनासाठी विद्यार्थ्‍यांना एक तास वाचनकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे काम या काळात शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. कोविड-१९ मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे झालेले नुकसान भरून करण्यासाठी गावपातळीवर शिक्षक मित्र व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्‍याच्‍या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या आहेत.

चौकट -

नांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ७३१ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या २ हजार १९८ शाळा आहेत. या शाळांमधून शिक्षण देणारे २४ हजार ४६८ शिक्षक, तर ६ लाख ९५ हजार १ विद्यार्थी आहेत. यात जिल्हा परिषदेचे ९ हजार २२३ शिक्षक, तर २ लाख ६ हजार १६९ विद्यार्थी आहेत.

Web Title: Schools to be filled without students from today; Education through online home visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.