पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालक तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:07+5:302021-01-18T04:16:07+5:30
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या- पाचवी -६३,२०५, सहावी- ६०,१४६, सातवी- ६०,२०८, आठवी- ५८,४६० जिल्ह्यातील शाळांची संख्या - ९,२७८, जिल्ह्यातील शिक्षक संख्या ...
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या- पाचवी -६३,२०५, सहावी- ६०,१४६, सातवी- ६०,२०८, आठवी- ५८,४६०
जिल्ह्यातील शाळांची संख्या - ९,२७८, जिल्ह्यातील शिक्षक संख्या -१,९८२
चौकट- नववी ते बारावीची ३८ टक्के उपस्थिती
जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा नोव्हेंबर अखेर सुरू करण्यात आल्या. मात्र, कोरोनाची भीती कायम असल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असल्याचे चित्र आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ३ लाख ७२ हजार ६६९ एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.
पालकांना काय वाटते
१. मागील दहा महिन्यांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाइन शिक्षणाचे प्रभाव पडत नसल्याने मुलांना शाळेत पाठविणे गरजेचे आहे. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर
२. कोरोनाची भीती कायम असली, तरी मुलांना शाळेत पाठविणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक तयारी झाली आहे. - सी.एल. गायकवाड
३. शाळांना योग्य खबरदारी घेऊन शाळा सुरू करणे गरजेचे आहे. मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. - संजय पाटील
शिक्षणाधिकाऱ्यांचा कोट- शिक्षण विभागाने सर्व शाळांचा आढावा घेऊन स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. शाळा निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या प्रमुख सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड