गर्भपाताच्या गोळ्यांसाठी सीमोल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:12+5:302021-07-21T04:14:12+5:30
सहाशे रुपयांच्या किटसाठी सहा हजार गर्भपातासाठी पाच गोळ्यांची एक किट असते. यातील पहिली गोळी घेतल्यानंतर त्या महिलेला प्रचंड प्रमाणात ...
सहाशे रुपयांच्या किटसाठी सहा हजार
गर्भपातासाठी पाच गोळ्यांची एक किट असते. यातील पहिली गोळी घेतल्यानंतर त्या महिलेला प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होतो. रक्तस्राव होणे म्हणजेच गर्भपात झाला असे समजून टप्प्याटप्प्याने इतर चार गोळ्या रक्तस्राव कमी करण्यासाठी दिल्या जातात. या एका किटची किंमत साधारणत: ५९९ रुपये असते; परंतु काळ्या बाजारात त्यासाठी सहा ते आठ हजार रुपये मोजले जातात, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
एक किंवा दोन डॉक्टरांचा सल्ला गरजेचा
गर्भपातासाठी गर्भपात नियमन कायदा सरकारने केला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीही आहे. या समितीसमोर हा विषय येतो. समितीने मंजुरी दिल्यानंतरच गर्भपात करता येतो. १२ आठवड्यांपर्यंत एका डॉक्टरचा, तर १२ ते २० आठवड्यांपर्यंत दोन डॉक्टरांचा सल्ला त्यासाठी बंधनकारक आहे. शासनाने त्यासाठी ठरावीक ठिकाणी गर्भपात केंद्रांना मंजुरी दिली आहे. - डॉ. एस. आर. वाकोडे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख.