नांदेडचा दुसरा दिवसही आंदोलनांनी गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:14 AM2018-02-04T00:14:06+5:302018-02-04T00:15:50+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी दिवसभर विविध पक्ष संघटनांनी संताप व्यक्त केला होता़ त्यानंतर शनिवारचा दिवसही आंदोलनांनी गाजला़ यामध्ये तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी दिवसभर विविध पक्ष संघटनांनी संताप व्यक्त केला होता़ त्यानंतर शनिवारचा दिवसही आंदोलनांनी गाजला़ यामध्ये तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या़
एसडीपीआयच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर फेब्रुवारी महिन्यात मोहिम राबविण्यात येत आहे़ तीन तलाकचे विधेयक शरियतसोबत संविधान विरोधी आहे़ शरीयत हा एक सिव्हील लॉ आहे़ त्याला भाजप सरकार क्रिमीनल लॉ बनविण्याचा प्रयत्न करीत आहे़ जे पुरुष आपल्या पत्नीला तीन तलाक देईल त्याला तीन वर्षाच्या शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे़ त्या पुरुषावर त्याची पत्नी व मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे़ पुरुष तुरुंगात असताना पत्नी व मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला़ या आंदोलनात पापुलर फ्रंट आॅफ इंडीया, हॅपी क्लब, जमाअते इस्लामी हिंद, एटीएम सोशल वेलफेअर सोसायटी, तेहरीक खुदादाद या संघटना सहभागी झाल्या होत्या़
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधन वाढीबाबत व भाऊबीज भेटीचा आदेश त्वरित काढावा, लाभार्थीच्या आहाराची रक्कम तिप्पट करण्यात यावी, केंद्राचे भाडे वाढविण्याबाबतच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करावी, आयसीडीएस, एनएचएम या सर्व केंद्रीय कल्याणकारी सेवा योजना कायमस्वरुपी राबवाव्या, या योजनेतील कर्मचा-यांना शासकीय दर्जा द्यावा, कोणत्याही परिस्थितीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे किंवा अन्य योजनांचे खाजगीकरण करु नये, पोषण आहारांचा गेल्या आठ महिन्यांचा निधी पाठविण्यात आला नाही़ त्यामुळे बचतगट संकटात सापडले आहेत़
अन्यथा बचतगट आहार बंद करतील़ एकात्मिक सेवा योजनांच्या जागांवर तातडीने बालविकास प्रकल्प अधिकारी, लिपीक, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती करावी़ आदी मागण्यांसाठी शनिवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात कार्याध्यक्षा मंगला सराफ, जिल्हाध्यक्ष शततारका काटकाडे, अश्विनी महल्ले, अरुणा आलोने, राजू लोखंडे, वंदना पवार, सत्वशिला पंडीत, महानंदा पांचाळ, अनुसया नवसागरे, विजया लाभशेटवार, प्रभाताई मामीडवार, निर्मला दापकेकर यांचा समावेश होता़
केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात शुक्रवारी काँग्रेसस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते़ त्यानंतर शनिवारी दिवसभर विविध पक्ष आणि संघटनांच्या आंदोलनांनी परिसर दणाणला होता़
कायद्याला विरोध
तीन तलाकचे बिल मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी नसून हक्कांची पायमल्ली करण्यासाठी आहे असा आरोप एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष एजाज अहेमद शेख यांनी केले़ तर पापुलर फ्रंट आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आबेद अली म्हणाले, इस्लाम ने मुस्लिम महिलांना जे हक्क दिले, तसे हक्क इतर कोणत्याही धर्माने महिलांना दिले नाही़ परंतु मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या नावावर भाजप सरकार तीन तलाकचा कायदा जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करीत आहे़ तर रुबीना खान म्हणाल्या, आम्हा महिलांना या कायद्याची आवश्यकता नाही़ आम्ही शरीयतवर समाधानी आहोत़ शरीयतमध्ये कुणाचीही दखल खपवून घेतली जाणार नाही असेही त्या म्हणाल्या़
तलाठी संघाचे निषेध आंदोलन
४अंमळनेर तालुक्यातील पिंगळवाडीचे तलाठी योगेश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या वतीने शनिवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले़
४या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी तलाठी संघाच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे़ योगेश पाटील हे गौण खनिज उत्खनन करुन वाहतुक करणाºया वाहनांवर कारवाई करीत असताना त्यांना जणांनी बेदम मारहाण केली़ महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने आजपासून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरु केले आहे़ ७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ ९ रोजी लेखणीबंदचा इशारा देण्यात आला आहे़ या आंदोलनात सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील अव्वल कारकून सहभागी होणार आहेत़ शिष्टमंडळात तलाठी संघाचे राज्य उपाध्यक्ष एम़एमक़ाकडे,अध्यक्ष कानगुले, उदयकुमार मिसाळे, एस़जी़पठाण, एम़एऩदेवणे, गजानन सुरकुटवार यांचा समावेश होता़