तब्बल नऊ महिन्यांनंतर बिलोली तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:30+5:302020-12-07T04:12:30+5:30

बिलोली गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे शंभर टक्के भेटीचे उद्दिष्ट ठेवून भेटीचे नियोजन करण्यात आले ...

Secondary and higher secondary schools in Biloli taluka started after nine months | तब्बल नऊ महिन्यांनंतर बिलोली तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू

तब्बल नऊ महिन्यांनंतर बिलोली तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू

Next

बिलोली गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे शंभर टक्के भेटीचे उद्दिष्ट ठेवून भेटीचे नियोजन करण्यात आले होते. सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील घटक शिविअ सागरबाई भैरवाड, केंद्रप्रमुख यादवराव कोटकर, बालाजी येसके, माधव लोलमवाड, विषयतज्ञ सुरेश राठोड, गुणवंत हलगरे, प्रल्हाद ढाकणे, श्रीनिवास मंगनाळे, विशेष शिक्षक महेमूद शेख, संतोष पाटील, ज्योती संगनोड, शिल्पा बंदमवार, सविता शिरशेटवार यांना शाळा भेटीचे नियोजन देण्यात आले. त्यानुसार २ व ३ डिसेंबर या कालावधीत सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रपत्रानुसार शाळांना भेटी दिल्या. यामध्ये कोविड १९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांची व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी, शाळा निर्जंतुकीकरण, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आरटीपीसीआर चाचणी, पालकांचे संमतीपत्र, शालेय व्यवस्थापन समितीकडून पडताळणी, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी, स्पर्शविरहित हजेरी, विद्यार्थी नावानिशी बैठक व्यवस्था, कार्य गट विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मास्कचा वापर, लॅपटॉप, डेस्क, टेबल-खुर्च्या निर्जंतुकीकरण, राज्य हेल्पलाइन नंबर, स्थानिक आरोग्य कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक, आरोग्य सेतू, बाहेर पडण्याचे वेळापत्रक, अध्यापन तासिकेचे नियोजन, ऑनलाइन -ऑफलाइन अध्यापनाचे वेळापत्रक इत्यादी मुद्द्यांच्या आधारे शाळांना भेटी देऊन खात्री करण्यात आली व सुधारणा करण्यासाठी सर्वांशी संवाद साधण्यात आला. तालुक्यात एकूण ४० शाळा असून, प्राप्त अहवालानुसार ३६९ शिक्षकांपैकी ३११ शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी १८४ पैकी १६१ उपस्थित होते. ९ वी ते १२ वीच्या एकूण ७६६० विद्यार्थ्यांपैकी पालकांच्या संमतीपत्रानुसार १३७६ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. विद्यार्थी उपस्थिती १७.९६ टक्के होती.

Web Title: Secondary and higher secondary schools in Biloli taluka started after nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.