माहूरमध्ये पेट्रोलिंगदरम्यान वाहनातून गुटख्यासह घातक शस्त्र जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 06:36 PM2021-09-22T18:36:16+5:302021-09-22T18:36:43+5:30
वाहनात बाबर अहेमद शेख फकीर महम्मद मुजावर असे नाव असलेले आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन आढळून आले आहे.
माहूर ( नांदेड ) : बसस्थानक परिसरात बुधवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान संशयास्पदरित्या जात असलेल्या एका चारचाकीस ( क्र.०४ एफ.एफ. ३०२० ) गस्तीवर असलेल्या माहूर पोलिसांनी अडवले. झडती दरम्यान वाहनातून प्रतिबंधित गुटखा व घातक शस्त्रे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास ३ लाख रुपयांचा गुटखा, दोन धारदार शस्त्रे आणि चारचाकी जप्त केली आहे.
वाहनात बाबर अहेमद शेख फकीर महम्मद मुजावर असे नाव असलेले आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन आढळून आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, स.पो.नि. अण्णासाहेब पवार, पो.हे.कॉ. आनंदराव राठोड, पो.कॉ. साहेबराव सगरोळीकर, चालक रामचंद्र दराडे, पो.ना.छगन जाधव यांच्या पथकाने केली.