आळंदीकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:26+5:302021-03-05T04:18:26+5:30
पोदार स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शन नांदेड- येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये ऊर्जा संवर्धन या संकल्पनेवर आधारीत विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. ...
पोदार स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शन
नांदेड- येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये ऊर्जा संवर्धन या संकल्पनेवर आधारीत विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनात इयता ५ वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संदीपकुमार लठ यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
वृद्धाश्रमात रमाई जयंती
नांदेड- येथील संध्याछाया वृद्धाश्रमात रमाई जयंती साजरी करण्यात आली. महिला काँग्रेसच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रणिता भरणे, वर्षा सदावर्ते, साईनाथ आदींची उपस्थिती होती.
कर निरीक्षकांच्या बदलीची मागणी
नांदेड- सिडको-हडको झोन अंतर्गत क्षत्रिय अधिकारी सहामधील वसुली लिपीक व कर निरीक्षकांची इतरत्र बदली करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे शैलेशसिंह गुरुसिंहरावत यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
नामदेव क्षत्रिय महासंघाची मागणी
नांदेड- संत नामदेव महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करुन ७५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करावा, अशी मागणी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाने केली आहे. महासंघाचे दिपक जल्लावार यांनी याबाबतचे पत्रक दिले असून नामदेवांच्या कार्याचा गौरव होण्याची गरज व्यक्त केली आहे.