किनवट अभिवक्ता संघाच्या कार्यकारिणीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:07 AM2021-02-05T06:07:43+5:302021-02-05T06:07:43+5:30
अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले. पदाधिकारी असे ...
अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले. पदाधिकारी असे - अध्यक्ष ॲड. अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष ॲड. तोफिक कुरेशी, सचिव ॲड. पंकज गावंडे, सहसचिव ॲड. नितीन पवार, कोषाध्यक्ष ॲड. सुनील येरेकार. दोन कार्यकारिणी सदस्यांची लवकरच निवड करण्यात येईल.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय चाडावार यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. सुनील येरेकार यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेसाठी विठ्ठल आरपेलीवार व संतोष जकुलवाड यांनी सहकार्य केले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ॲड. अनंत वैद्य, ॲड. सुभाष ताजने, ॲड. यशवंत गजभारे, ॲड. दीनानाथ दराडे, ॲड. राहुल सोनकांबळे आदींनी पुढाकार घेतला होता.