राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:08+5:302021-02-13T04:18:08+5:30
५ व ६ फेब्रुवारी रोजी आरचेरी स्कूल नांदेड श्री गुरू गोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे संपन झालेल्या जिल्हास्तर निवड चाचणी ...
५ व ६ फेब्रुवारी रोजी आरचेरी स्कूल नांदेड श्री गुरू गोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे संपन झालेल्या जिल्हास्तर निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड मनपाचे उप आयुक्त विलास भोसले, सम्यक न्यूजचे प्रमुख विजय निलंगेकर,मंगेश कामतीकर,वृषाली पाटील जोगदंड ,बालाजी चेरले,स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे ,प्रकाश कांबळे ,पतंगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडूंना पदके प्रदान करण्यात आली.
यामध्ये सब ज्युनियर मुले इंडियन राऊंड अनिकेत पांचाळ, विवेक सुरकुटलावार ,श्रीराम व्यवहारे ,तेजस दंमकोंडवार , ज्युनिअर मुले सार्थ पांढरे ,पठाण सदातूला खान ,आदित्य चव्हाण ,पृथ्वीराज कदम ,प्रतीक जाधव, प्रफुल्ल जाधव, सब ज्युनियर मुले रिकव्हर तुलजेश पवार, अमरनाथ मोरे, अथर्व भुसेवर, आकाश रावले, ज्युनियर मुले रिकव्हर मार्तंड चेरले, तुलजेश पवार, अमरनाथ मोरे, ज्युनियर मुले कंपाऊंड आकाश गायकवाड, तेजबिरसिंह जहागीरदार, अथर्व जोंधळे, अक्षरा येरडाळवार, सबज्युनियर मुली रिकव्हर मध्ये सृष्टी जोगदंड, आर्या गुबरे, राधिका कोटरवार यांची निवड झाली असून निवडलेल्या संघाचे प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षक वृषाली पाटील जोगदंड यांचा मार्गदर्शनाखाली १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान लावण्यात येणार आहे.
सदरील संघ १७ तारखेला अमरावतीला रवाना होणार असून संघास नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, उपायुक्त विलास भोसीकर, रमेश चवरे, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, जयपाल रेड्डी, मंगेश कामतीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी अतुल गोडबोले, राजेश व्यवहारे, शिवाजी पूजरवाड, नरेश कोटीतीर्थ यांनी मेहनत घेतली.