धर्माबादेत वाळूची जादा दराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:33 AM2019-04-02T00:33:11+5:302019-04-02T00:34:05+5:30

तालुक्यातील गोदावरी नदीकाठेला जी गावे आहेत, त्या भागातून रात्री बेकायदेशीर नदी पात्रातून वाळूचा उपसा करून चढ्या भावाने करीत आहेत.

Selling at the rate of excess sand in religion | धर्माबादेत वाळूची जादा दराने विक्री

धर्माबादेत वाळूची जादा दराने विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देवाळू तस्कराची चांदी दीड ब्रास वाळूला सात हजार रूपये

धर्माबाद : तालुक्यातील गोदावरी नदीकाठेला जी गावे आहेत, त्या भागातून रात्री बेकायदेशीर नदी पात्रातून वाळूचा उपसा करून चढ्या भावाने करीत आहेत. बाधंकाम करणाऱ्यांचे बेहाल होत असून वाळू तस्करी मात्र मालामाल बनत आहे. तहसील प्रशासन लोकसभा निवडणुकीत मग्न असल्याचे पाहून वाळूमाफीयांनी ही संधी साधली आहे़
धर्माबाद तालुक्यातून गोदावरी नदी वाहाते़ आटाळा ते बेल्लूरपर्यंत असलेल्या नदीकाठच्या बाजूला असलेल्या गाव परिसरातून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. रत्नाळी, बाळापूर, रामपूर, रामेश्वर, सिरसखोड, इळेगाव, मनूर, बामणी संगम, आल्लूर, चिचोंली, बेल्लुर (बु), बेल्लूर (खु), बाभळी बंधारा, शेळगाव, माष्टी, पाटोदा, दिग्रस, जारिकोट, चोळाखा, चोंडी, बेलगुजरी कारेगाव, आटाळा, यल्लापूर या भागातील नदीपात्रातून रात्री बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करीत आहे.
रात्रीला वाळू चोरून कुठे शेतात तर कुठे प्लॉटींगमध्ये व रिकाम्या जागेत वाळूचा साठा करीत आहेत. कोणाला ताबडतोब वाळू पाहिजे असेल तर रातोरात बेभावात विक्री करीत आहेत. दीड ब्रास वाळू (एक टॅक्टर भरून) सात हजार रुपयास विक्री केल्या जात आहे. घराचे बाधंकाम करणारे लाभार्थी नाईलाजाने खरेदी करीत आहेत. एवढ्या मोठ्या किमतीने वाळू खरेदी करणे हे धर्माबादेत पहिल्यांदाच आहे. रत्नाळी, बाभळी बंधारा बेल्लुर, इळेगाव, पाटोदा, चोंडी, सिरसखोड, संगम, आटाळा या मुख्य ठिकाणी मोठ्या वाळूचा उपसा बेकायदेशीर केला जात आहे.
वाळूचा लिलाव लवकर या वर्षी झाला नसल्याने गोदावरी नदी पात्रातील काळ्या वाळूचा भाव गगणाला भिडला आहे. वाळू तस्करी हे रात्रीला बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करून बेकायदेशीर साठा करीत आहे. घरकुल बांधकामाचे कारण सांगून वाळू तस्कर मालामाल बनत आहेत.

Web Title: Selling at the rate of excess sand in religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.