सर्व्हर डाऊन, उमेदवारांची उडाली धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:28+5:302020-12-26T04:14:28+5:30
२३ डिसेंबर, बुधवार रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याचा पहिला दिवस होता. मात्र, राखीव जागेसाठी उमेदवारांना जात पडताळणी पावती, बँक पासबुक, चरित्र ...
२३ डिसेंबर, बुधवार रोजी नामनिर्देशनपत्र भरण्याचा पहिला दिवस होता. मात्र, राखीव जागेसाठी उमेदवारांना जात पडताळणी पावती, बँक पासबुक, चरित्र पडताळणी आधी कागदपत्र गोळा करण्यात उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत उमेदवारीसाठी अनेक नवख्या, हौशागौशांची माहितीअभावी व सर्व्हर डाऊन असल्यामुळे नामनिर्देशन भरण्यासाठी उमेदवारांची धांदल उडाली.
अर्धापूर तहसील प्रशासनाच्या वतीने नामनिर्देशनपत्र आदी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पंचवीस ते तीस कक्ष तयार करण्यात आले आहेत. यासाठी शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १२ निवडणूक निर्णय, अधिकारी १२ सहायक निवडणूक अधिकारी आदींची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात आली असून सर्व यंत्रणा कार्यरत आहे. सर्व उमेदवारांनी नियमाचे पालन करत शांतता राखावी, असे आवाहन तहसीलदार सुजित नरहरे निवडणूक अधिकारी मारोतराव जगताप यांनी यावेळी केले आहे.