२१ केंद्रावर होणार सेट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:21+5:302020-12-13T04:32:21+5:30

जिल्ह्यातील विविध २१ विद्यालय, महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे ...

Set examination will be held at 21 centers | २१ केंद्रावर होणार सेट परीक्षा

२१ केंद्रावर होणार सेट परीक्षा

Next

जिल्ह्यातील विविध २१ विद्यालय, महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी वरील वेळ परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. केंद्र परिसरातील १०० मीटर पर्यंतच्या जागेत सार्वजनिक टेलिफोन, फॅक्स, झेरॉक्स यासाठीही प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.नांदेड : महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२०. २७ डिसेंबर रोजी रविवारी जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.नांदेड : महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२०. २७ डिसेंबर रोजी रविवारी जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील विविध २१ विद्यालय, महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी वरील वेळ परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. केंद्र परिसरातील १०० मीटर पर्यंतच्या जागेत सार्वजनिक टेलिफोन, फॅक्स, झेरॉक्स यासाठीही प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Web Title: Set examination will be held at 21 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.