सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघडकीस आले सात गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:57+5:302020-12-08T04:14:57+5:30

नांदेड- मागील काही दिवसात नांदेड शहर आणि परिसरात चैन स्नॅचिंग आणि जबरी चाेरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या ...

Seven crimes were uncovered by CCTV cameras | सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघडकीस आले सात गुन्हे

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उघडकीस आले सात गुन्हे

Next

नांदेड- मागील काही दिवसात नांदेड शहर आणि परिसरात चैन स्नॅचिंग आणि जबरी चाेरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तब्बल सात गुन्हे उघडकीस आले असून सात लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाच जबरी चाेरी बरोबर एका घरफोडीच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात नांदेड शहरातील शिवाजीनगर, विमानतळ तसेच भाग्यनगर या भागात चैन स्नॅचिंग आणि जबरी चाेरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढली होती. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी सदर गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्याचे तसेच यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डींगची मदत घेण्याचे निर्देश दिले होेते. त्यानुसार पाेलीस निरीक्षक नरुटे आणि शिवाजीनगर ठाण्यातील सह.पोलीस निरीक्षक डोके यांनी कर्मचाऱ्यांसह शहरातील पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डींगची तपासणी केली. तसेच चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतले. या मोहिमेअंतर्गत ३० नोव्हेंबर रोजी अनिल सुरेश पवार उर्फ अनिल पंजाबी यास अटक केली. तर ३ डिसेंबर रोजी शेख आमेर शेख पाशा (रा.सिडको) हा जाळ्यात सापडला. ४ डिसेंबर रोजी चैतन्यनगरमधून सचिन शिंदे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे शहरातील चैन स्नॅचिंगच्या घटनाबाबत विचारपूस केली असता चैन स्नॅचिंगच्या पाच जबरी चोऱ्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याच्याकडून ९०.६३ ग्राम सोने, चार मंगळसूत्र व एक नेकलेस असा ४ लाख ३७ हजार ७४१ रुपयांचा मुद्देमाल तसेच १ लाख १२ हजार रुपयाची मोटारसायकल असा एकूण ५ लाख ६९ हजार ७४१ रुपयांचा ऐवज जप्त केला. याबरोबरच २७ नोव्हेंबर रोजी गोपाळ उर्फ किशनाला बटावाले यास विष्णूनगर परिसरातून अटक करून त्याच्याकडून १ लाख १ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपीकडून एक घरफोडीचा व एका मोटारसायकल चोरीचा गुन्हाही उघड झाला आहे.

सदरील बातमीचा फोटो

फोटो नं. ०७एनपीएचडीईसी०१

फोटो कॅप्शन - नांदेडमधील शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाच जबरी चोरीचे, एक घरफोडीचा तर एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत ७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही करणाऱ्या पथकासोबत पोलीस निरीक्षक ए. एन. नरुटे.

Web Title: Seven crimes were uncovered by CCTV cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.