विष्णूपुरीत पोहोचले सात दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:40 AM2019-06-26T00:40:57+5:302019-06-26T00:42:04+5:30

भीषण नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले होते़ हे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले असून तब्बल पंधरा दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात सोडलेल्या १४ दलघमीपैकी ७ दलघमी पाणी पोहोचले आहे़

Seven Dalgami water reached Vishnupur | विष्णूपुरीत पोहोचले सात दलघमी पाणी

विष्णूपुरीत पोहोचले सात दलघमी पाणी

Next
ठळक मुद्देसिद्धेश्वर प्रकल्प १० जूनला सोडले होते १४ दलघमी पाणी

नांदेड : भीषण नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले होते़ हे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले असून तब्बल पंधरा दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात सोडलेल्या १४ दलघमीपैकी ७ दलघमी पाणी पोहोचले आहे़ या पाण्यामुळे विष्णूपुरीच्या पाणीपातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे़ त्यामुळे टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे़
नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प ३० मे पासूनच कोरडा झाला होता़ त्यामुळे पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरू आहे़ शहरातील अनेक भागांत आठ-आठ दिवस पाणीपुरवठा झाला नाही़ महापालिकेकडून सुरु करण्यात आलेल्या टँकरची संख्याही अपुरी आहे़ त्यामुळे नांदेडकरांना हजारो रुपये खर्च करुन खाजगी टँकरचालकाकडे धाव घ्यावी लागत आहे़
विष्णूपुरी कोरडा पडल्यानंतर येलदरी, दिग्रस हे प्रकल्पही कोरडेच होते. त्यामुळे पाणी कुठून आणणार असा प्रश्न होता़ पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता़
सिद्धेश्वर प्रकल्पातून विष्णूपुरीमध्ये पाणी आणणे अवघड काम होते़ त्यासाठी मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले होते़ त्यानंतर १० जून रोजी सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरीकडे पाणी झेपावले़ तब्बल १२० किमीचा प्रवास या पाण्याने केला आहे़ सिद्धेश्वरमधून १२३ क्युसेस विसर्ग सुरू आहे.
प्रतितास १ किलोमीटर या वेगाने पाणी नांदेडमध्ये दाखल झाले़ विष्णूपुरीपर्यंत येताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यवही झाला़ वसमत येथील वापरात नसलेला तलाव भरुन घेण्यात आला़ या पाण्यावर देखरेखीसाठी असलेल्या पथकांना याचा थांगपत्ताही लागला नाही़
सिद्धेश्वरमधून १४ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने हे पाणी सोडण्यात आले असून २५ जूनपर्यंत प्रकल्पात ७ दलघमी एवढे पाणी पोहोचले होते़ या पाण्यामुळे विष्णूपुरीच्या पातळील ३ फुटांनी वाढ झाली आहे़
विष्णूपुरीतून ३० दलघमी पाणी आरक्षित
४नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़ त्यातच दिग्रस बंधाºयातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते़ परंतु ते पाणीही संपल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले होते़ मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणी उपसा रोखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मे मध्येच पाण्यासाठी भटकंती करावी लागली़ पाऊस लांबत चालली असून पाणी जपून वापरण्याची गरज आहे़

Web Title: Seven Dalgami water reached Vishnupur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.