सात हजार ६८१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:43+5:302021-03-05T04:18:43+5:30
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही २७ डिसेंबर २०१९ च्या शासन ...
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही २७ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे कार्यान्वित केली आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील ३० सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ आपले तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तक्रार निकाली काढून घ्यावी.
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असून, त्यापैकी बँकांनी २ लाख ७ हजार ३६ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांची अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाचे कर्जमाफी पात्र असणाऱ्या १ लाख ९४ हजार २१६ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ८६ हजार ५३५ शेतकऱ्यांची आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण कलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ७९ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे १ हजार २२९.२२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.