सात गावांत भूसंपादन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:02 AM2018-08-19T01:02:24+5:302018-08-19T01:03:22+5:30
वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जवळपास २५ कोटींहून अधिक रकमेचा मावेजा यासाठी अदा करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जवळपास २५ कोटींहून अधिक रकमेचा मावेजा यासाठी अदा करण्यात येत आहे.
नांदेड-वर्धा या प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि हदगाव या दोन तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन केले जात आहे. महसूल विभागाकडून ही प्रक्रिया वेगाने केली जात असली तरी रेल्वे विभागाकडून मात्र महसूल विभागाने संपादित केलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोणत्याही हालचाली अद्याप सुरू झाल्या नाहीत. यामुळे महसूल विभागाने संपादित केलेली जमीन कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.
अर्धापूर तालुक्यातील चिंचवण येथील ०.८० कि.मी. जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासह पार्डी मक्ता येथील २ कि.मी. साठी ७ आर, कारवाडी येथील ६ किमीसाठी २.४६ आर, अमरापूर येथील १.२३ किमीसाठी ६.७२ आर, हमरापूर येथील १.६८ किमीसाठी १०.११ आर, बारसगाव येथे १.५७ किमीसाठी १२.१४ आर आणि लतीफपूर येथील २.२५ किमीसाठी ५.४२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे.
या जमिनीसाठी लागणारी संयुक्त मोजणी करण्यात आली आहे. तसेच मावेजा वाटप करुन ताबाही घेण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील देगाव (बु) येथे २.६७ किमी अंतरासाठी ७.८५ आर, यमशेटवाडी येथे ०.३७ कि.मी. अंतरासाठी २.१९ आर, येळेगाव येथे २३.८९ किमीसाठी ३४.३० आर आणि अर्धापूर येथे ३७.९६ आर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नांदेड-वर्धा रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील ४४.२५ कि.मी. रेल्वे मार्गासाठी ११७.५१ आर जमीन संपादित केली जात आहे.