सात वाळूमाफियांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:37 AM2019-06-26T00:37:28+5:302019-06-26T00:39:29+5:30

बेकायदेशीर वाळू चोरी करून, रात्रीला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चार वाहनांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी २४ जून रोजी रात्री कारवाई केली. वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक टेम्पो व एक टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वाळू तस्करांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Seven walnuts are filed in the crime | सात वाळूमाफियांवर गुन्हा दाखल

सात वाळूमाफियांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देधर्माबादेत कारवाई १४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

धर्माबाद : बेकायदेशीर वाळू चोरी करून, रात्रीला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चार वाहनांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी २४ जून रोजी रात्री कारवाई केली. वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक टेम्पो व एक टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे वाळू तस्करांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात रात्रीला चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळताच सहायक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे याच्यांसह पथकांनी २४ जून रोजी रात्रीला शहरातील मोंढा हनुमान मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर वाळू चोरून नेताना टिप्पर क्रमांक (टीएस १६-युव्ही ७७५३), आयचर टेम्पो क्रमांक (एपी २३-डब्लूओ १४५) हे दोन वाहने बेकायदेशीर वाळूने भरलेले आढळून आले.
आरोपी शेख मस्तान शेख बाबूमियॉ रा.फुलेनगर धर्माबाद (टिप्पर चालक ), शेख मुजारण शेख बाबूमियॉ (रा.फुलेनगर धर्माबाद) (टिप्परमालक ), राहुल गणेश तुपसाखरे (रा.फुलेनगर धर्माबाद) (आयशर टेम्पोचालक) आणि टेम्पो मालकावर गुन्हा दाखल करून वाळूसह दोन वाहने जप्त केली आहेत़ या कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे़
कारेगाव रस्त्यावर दोन ट्रॅक्टर पकडले
च्कारेगाव ते धर्माबाद रस्त्यावर पिपंळगाव पाटीजवळ रात्रीला बेकायदेशीर वाळू चोरून नेताना दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले.(एमएच-२६-बीसी-९४८२), (एमएच-२६-बीई ३१५८) या क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूसह पकडून सहा लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आरोपी मारोती आत्माराम लाब्दे, अविनाश पिराजी जाधव, गजानन शिवाजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Seven walnuts are filed in the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.