शहाजीराजे जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:55+5:302021-03-20T04:16:55+5:30
पिंपरीतील पथदिवे सुरू नांदेड : तालुक्यातील पिंपरी महिपाल येथील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद होते. परंतु, ग्रामपंचायतीमध्ये नवयुवकांच्या पॅनलला ...
पिंपरीतील पथदिवे सुरू
नांदेड : तालुक्यातील पिंपरी महिपाल येथील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद होते. परंतु, ग्रामपंचायतीमध्ये नवयुवकांच्या पॅनलला गावकऱ्यांनी पसंती देत नवख्या चेहऱ्यास सरपंचपदाची संधी दिली. सरपंच, उपसरपंच निवडी झाल्यानंतर नवीन सदस्य मंडळ कामाला लागले आहे. प्रारंभी गावातील बंद पथदिवे सुरू करून गाव प्रकाशमय करण्याचे काम केले आहे. त्यासाठी सरपंच प्रतिनिधी हनुमान चंदेल, कमलेश कदम, गिरधारी जोगदंड आदींनी पुढाकार घेतला.
पेट्रोलपंपावर हवा बंदच
नांदेड : पेट्रोलपंपावर इंधन भरणाऱ्या वाहनचालकांना मोफत हवा भरून देण्याचा नियम असताना शहरातील पेट्रोलपंप चालकांकडून या नियमाला केराची टोपली दाखविली जात आहे. नांदेड शहरात जवळपास अठरा पंप आहेत. परंतु, एक ते दोनच पंपांवर हवा भरून दिली जाते. उर्वरित पंपांवरील हवा भरण्याची मशीन केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
शेतकऱ्यांची चिंचा वाढली
नांदेड : हवामान विभागाच्या वतीने पावसासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आजघडीला हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेतो की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतात सध्या हळद, गहू, हरभरा आदी पिके काढणीसाठी आलेली आहेत.
आठवडी बाजार सुरूच
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध नियम घालून देण्यात आले असून, हॉटेल्स, गर्दी होणारी दुकाने, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु, सर्वाधिक गर्दी होणारी आठवडी बाजार मात्र सुरूच आहेत. काही तालुक्यांत ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शुक्रवारी शहरातील आठवडी बाजार सुरूच होता.