मुख्यालयी राहून रात्रीबेरात्री येणाऱ्या रुग्णांवर केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:05 AM2019-05-12T01:05:46+5:302019-05-12T01:06:13+5:30
गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कर्तव्य बजावणा-या पीक़े़ भगत यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून रात्री-अपरात्री उपचाराकामी येणा-या रुग्णांवर प्रथमोपचार करून दिलासा देण्याचे कार्य करत अनेक राष्ट्रीय उपक्रमांत त्यांचा मोठा वाटा दिसून येत आहे़
नितेश बनसोडे
श्रीक्षेत्र माहूर : गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कर्तव्य बजावणा-या पीक़े़ भगत यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून रात्री-अपरात्री उपचाराकामी येणा-या रुग्णांवर प्रथमोपचार करून दिलासा देण्याचे कार्य करत अनेक राष्ट्रीय उपक्रमांत त्यांचा मोठा वाटा दिसून येत आहे़ त्यांना कर्तव्यदक्ष परिचारिका म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी संबोधत असतात़
माहूर तालुक्यातील वानोळा येथे सध्या कार्यरत असणाºया परिचारिका पी़ के़ भगत यांची २ आॅगस्ट १९८४ ला मांडवी येथे नेमणूक झाली़ त्यानंतर माहूर प्रा़आ़ केंद्र लोहगाव, आष्टा, सिंदखेड, दहेलीतांडा या ठिकाणी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले़ गरजू, गोरगरीब रुग्णांना औषधी-गोळ्या देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली़ याशिवाय अनेक गर्भवती महिलांची प्रसूती सुलभतेने करण्याचे कार्यही त्यांच्या हातून घडले आहे, नव्हे घडत आहे़
त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाºया गावात गरोदर मातांची १०० टक्के नोंदणी करून लसीकरण केले़ तसेच आरोग्य सुविधा पुरविल्या़ त्याआधी गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून घेतली़ एवढ्यावरच न थांबता प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजनेअंतर्गत दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांची तपासणी करून उपचार करणे व गर्भातील अर्भकाची काळजी घेत गरोदर मातांच्याही आरोग्याची काळजी घेवून त्यांना वारंवार मार्गदर्शन करण्याचे काम त्या नित्याने करतात़
गर्भवती महिलांच्या रक्ताशयात अॅनिमिया हा आजार आहे का हे ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून त्यांच्यावर वेळीच उपचार करत गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखले़
माहूर तालुक्यातील वानोळा हा भाग आदिवासी, डोंगराळ, बंजाराबहुल असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावे येत असून १६ हजार ८०० लोकसंख्या आहे़ याच प्रा़आ़ केंद्रांतर्गत चार आरोग्य उपकेंद्र येतात़ त्यांच्या आरोग्याची देखभाल करत आहे, त्या परिस्थितीत आरोग्य सेवा पुरवून जनतेचा आशीर्वाद घेत आहेत़ माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांना १०० टक्के लसीकरण करून ते कसे निरोगी राहतील यावर त्यांचा अधिकार भर असतो़ त्याच्या कार्यावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया वानोळा प्रा़आक़ेंद्राचे वै़अ़ डी़जी़जोगदंड यांनी दिली़
गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखले
माहूर तालुक्यातील वानोळा येथे सध्या कार्यरत असणाºया परिचारिका पीक़े़ भगत यांची २ आॅगस्ट १९८४ ला मांडवी येथे नेमणूक झाली़ त्यानंतर माहूर प्रा़ आ़ केंद्र लोहगाव, आष्टा, सिंदखेड, दहेलीतांडा या ठिकाणी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले़
गर्भवती महिलांच्या रक्ताशयात अॅनिमिया हा आजार आहे का, हे ओळखून वैद्यकीय अधिकाºयांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून त्यांच्यावर वेळीच उपचार करत गरोदर माता व बालमृत्यूला आळाही बसविला़
वानोळा हा भाग आदिवासी, डोंगराळ, बंजाराबहुल असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावे येत असून १६ हजार ८०० एवढी लोकसंख्या आहे़
वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना आरोग्य खात्याच्या वरिष्ठांनी व सहकाºयांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने मी माझे कार्य उत्तमपणे पार पाडू शकले़ केवळ मेहनत करून चालणार नाही, त्याला सहकार्याची जोड असली पाहिजे़
-पीक़े़भगत, परिचारिका, प्रा़आक़ेंद्र, वानोळा, ता़माहूर