पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:19 PM2022-09-08T17:19:49+5:302022-09-08T17:20:25+5:30

भोकर तालुक्यातील पिंपळढव येथील घटनेत दोन मुले सुखरूप आहेत

Sheltered under a tree in the rain; Wife killed and husband injured due to lightning strike in farm | पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

Next

भोकर (नांदेड) : तालुक्यातील मौ. पिंपळढव  येथे शेतात काम करीत असलेल्या ललिता सुभाष पोले (३८) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर पती सुभाष पोले जखमी झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली आहे. 

पिंपळढव येथील शेतकरी सुभाष पोले हे पत्नी ललिता आणि दोन मुलांसह शेतात काम करत होते . दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरु झाला. त्यामुळे पोले पत्नीसह शेतातील एक झाडाखाली थांबले. अचानक झाडावर वीज कोसळली. यात ललीता सुभाष पोलेचा जागीच मृत्यू झाला. तर सुभाष पोले हे जखमी झाले. जखमीवर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उपचार करण्यात येत आहेत. सुदैवाने सोबत असलेल्या दोन मुलांना  कोणतीही ईजा झाली नाही. घटनेची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे. 

Web Title: Sheltered under a tree in the rain; Wife killed and husband injured due to lightning strike in farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.