शिरफुलेचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:43+5:302021-03-18T04:17:43+5:30

वसुली बंद आंदोलन नांदेड : नांदेड परिमंडळातील लाइन स्टाफ जन्मित्र कामगारांना वसुलीसाठी जबाबदार धरून एकतर्फी कार्यवाही करून त्यांना बेकायदेशीर ...

Shirphule's success in the national competition | शिरफुलेचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

शिरफुलेचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

Next

वसुली बंद आंदोलन

नांदेड : नांदेड परिमंडळातील लाइन स्टाफ जन्मित्र कामगारांना वसुलीसाठी जबाबदार धरून एकतर्फी कार्यवाही करून त्यांना बेकायदेशीर निलंबन व प्रशासकीय बदली करत आहेत. त्यामुळे जन्मित्र कामगारांनी २३ मार्चपासून वीजदेयक वसुली बंद असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सहभागी होण्याचे आवाहन इलेक्ट्रिसिटी लाइनस्टाफ असोसिएशनने केले आहे.

बदलीची मागणी

नांदेड : कंधार तालुक्यातील सावरगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे, परंतु सदर योजना राबविण्यात येत असताना, कृषी सहायकाकडून भेदभाव होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त करत, त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. सदर निवेदनावर सरपंच व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जयंती साजरी

नांदेड : रामानंदनगर येथील नवनिकेतन प्रा.शाळा येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक टोंम्पे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

खेळाडूंना आवाहन

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील खेळाडूंसाठी बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये धावनपथ, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल आदी सुविधा उपलब्ध आहेत. सदर इनडोअर हॉल मासिक शुल्क भरून वापरण्याचे आवाहन तहसीलदार सुजीत नरहरे, तालुका क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले आहे.

Web Title: Shirphule's success in the national competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.