फुलवळसह परिसरात शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:14+5:302021-02-20T04:50:14+5:30
जि.प. के. प्रा. शाळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजे पूजन सरपंच विमलबाई मंगनाळे, उपसरपंच ...
जि.प. के. प्रा. शाळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजे पूजन सरपंच विमलबाई मंगनाळे, उपसरपंच तुळशीदास, अध्यक्ष नागनाथ गोधणे, माजी संरपच बालाजी देवकांबळे, ग्रा.पं सदस्य प्रवीण मंगनाळे, मु.अ.बी.एन. केद्रे, नवनाथ बनसोडे, सहशिक्षक मंगनाळे के.व्ही., कपाळे एन.पी., काब्दे एस.व्ही., सौ. होनराव ए.आर., पुराणिक एम.एच., गवळे एस.एन., हांडे.जे.के., गवलवाड यू.ए. अदिनी पूजन करून अभिवादन केले.
ग्रा.पं. कार्यालय फुलवळ येथेही सरपंच विमलबाई मंगनाळे यांच्या उपस्थित जयंती साजरी करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी टी.जी. पोटेवार, सह सर्व सदस्य उपस्थित होते.
बसवेश्वर विद्यालयातही जयंती साजरी करून अभिवादन केले मु.अ.बी.एन. मंगनाळे, नामवाडे, फुलवळकर सी.एम., जगदीश मंगनाळे, पांचाळ, निलेवाड, सौ. डांगे, सौ. नवघरे, सांबळे, दिगाबर रासवते, अदिनी अभिवादन केले.
ग्रा.पं. कार्यालय कंधारेवाडी येथे सरपंच किशनबाई गित्ते याच्या उपस्थित जयंती साजरी करण्यात आली. उपसरपंच शंकर डिगोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी ग्रामसेवक एम.एस. टेभुर्णे, ग्रा.पं. सदस्य उद्धव पुरी, मारोती दासरे, नागोराव केंद्रे, संगणक चालक राजीव कंधारे आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आंबुलगा ग्रामपंचायत कार्यालय येथेही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सुनीता मुसळे, उपसरपंच सचिन गुद्दे, ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. निलेवाड आदी उपस्थित होते.
मुंडेवाडी ग्रा.पं. कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सरपंच ज्ञानोबा (माउली) मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सरपंच ज्ञानोबा मुंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच जनाबाई केंद्रे, ग्रा.पं. सदस्य राजीव मुंडे, ममता मुंडे, राजीव मुंडे, ग्रामसेवक एस.डी. गुद्दे उपस्थित होते.
मानसिगवाडी ग्रा.पं. कार्यालयात ही शिवजयंती साजरी करण्यात आली. संरपच राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्रामसेवक गुंडे एस. व्ही., माधव राठोड आदी उपस्थित होते.