शिवशाहीला प्रवासी मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:22 AM2021-09-06T04:22:41+5:302021-09-06T04:22:41+5:30
चौकट बसेसचे दररोज सॅनिटायझेशन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी वाहतूक करून परतलेल्या प्रत्येक बसचे सॅनिटायझेशन करण्यात येत असे आगार व्यवस्थापक ...
चौकट
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवासी वाहतूक करून परतलेल्या प्रत्येक बसचे सॅनिटायझेशन करण्यात येत असे आगार व्यवस्थापक वर्षा येरेकर यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या गाड्या आगारात दाखल झाल्यानंतर त्या धुतल्या जातात. त्यानंतर पुन्हा फेरीसाठी निघालेल्या गाडीचे व्यवस्थित सॅनिटायझेशन करण्यात येते. त्याचबरोबर प्रवाशांची गर्दी होणार नाही, यासाठी शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे पालन करण्यात येते, असेही येरेकर यांनी सांगितले.
अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही....
शिवशाही गाड्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हैदराबाद, पुणे मार्गावरील काही बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या फेऱ्यांच्या माध्यमातूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यात काही शिवशाही गाड्याही ताेट्यातच धावत आहेत. - संजय वावळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नांदेड.