धक्कादायक! मुलानंतर बापालाही संपविले, शेतात जाताना केली निर्घृण हत्या
By शिवराज बिचेवार | Published: December 4, 2024 12:22 PM2024-12-04T12:22:03+5:302024-12-04T12:24:37+5:30
पोलिसांनी मुलाच्या खुनातील आरोपींची ही चौकशी करण्यास सुरवात केली आहे.
नांदेड : लोहा तालुक्यातील वाका शिवारात बुधवारी पहाटे 65 वर्षीय शेतकऱ्याचा भोसकून खून करण्यात आला. किसन खोसे असे मयताचे नाव असून तीन वर्षापूर्वी त्यांचा मुलगा वसिष्ठ याचा ही याच पद्धतीने खून करण्यात आला होता.
किसन खोसे हे बुधवारी पहाटे सहा वाजता शेताकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उप अधीक्षक अश्विनी जगताप यांनी भेट दिली. श्वान पथक आणि ठसे तज्ञाला ही पाचारण करण्यात आले होते. तीन वर्षापूर्वी किसन खोसे यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या खुनातील आरोपींची ही चौकशी करण्यास सुरवात केली आहे.