खड्ड्यांमुळे मायलेकाची ताटातूट; अपघातात मुलाच्या डोळ्यांसमोर आईने प्राण सोडले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:30 PM2021-11-25T13:30:04+5:302021-11-25T13:31:27+5:30

हिंगोली - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्याने घेतला बळी

Shocking ! The mother died in front of the child's eyes in the accident ..! | खड्ड्यांमुळे मायलेकाची ताटातूट; अपघातात मुलाच्या डोळ्यांसमोर आईने प्राण सोडले..!

खड्ड्यांमुळे मायलेकाची ताटातूट; अपघातात मुलाच्या डोळ्यांसमोर आईने प्राण सोडले..!

googlenewsNext

पार्डी (जि. नांदेड) : नांदेड ते वारंगा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात कोसळून दुचाकीवरील एका महिलेच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. आईचा जीव जाताना मुलगा तिच्या जवळ होता (The mother died in front of the child ). आईला वाचविण्यात तो हतबल झाला होता.

वाळकी बु. ता. किनवट येथील जनाबाई मारोती खोकले (वय ५३) व कोंडीबा मारोती खोकले (वय २८) हे दोघे मायलेक (एमएच २६ - एडब्ल्यू ३९२३) दुचाकीवरून काही कामानिमित्त कळमनुरी येथील पाहुण्यांकडे गेले होते. २४ रोजी सकाळी कळमनुरी ते भोकरमार्गे वाळकीला जाण्यासाठी म्हणून ते दोघे निघाले. पार्डी म. गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पाठीमागे बसलेल्या जनाबाई उसळून खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांनी त्यांच्या मुलासमोरच जीव सोडला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शेळके, श्रीवास्तव व वसंत शिनगारे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला व जखमी मुलाला अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केले.

रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती करा
नांदेड-वारंगा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात दररोज एक-दोन अपघात होताना दिसत आहे. ह्या खड्ड्याची दिवसेंदिवस लांबी-रुंदी वाढत चालली आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे प्रमाण पाहता संबंधिताने चालू रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याचेही काम करावे, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Shocking ! The mother died in front of the child's eyes in the accident ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.