धक्कादायक ! ज्वारीचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:15 PM2020-05-14T18:15:24+5:302020-05-14T18:16:14+5:30

नायगाव तालुक्यातील कुंटूरची घटना

Shocking! Rape on girl by showing the lure of sorghum in Nanded District | धक्कादायक ! ज्वारीचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

धक्कादायक ! ज्वारीचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

Next
ठळक मुद्देआरोपी पोलिसांच्या ताब्यात 

कुंटूर (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील बरबडा येथे घरासमोर उभ्या अल्पवयीन बालिकेला टाळकी ज्वारी देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ८ मे रोजी घडली. या प्रकरणी १३ मे रोजी रात्री कुंटूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून आरोपी सोनाजी हनमंते यास अटक केली आहे.

‘तु आमच्या शेतातील टाळकी ज्वारी कापायला ये, तुला आदलीभर (अडीच किलो) ज्वारी देतो, असे सांगून आरोपीने स्वत:च्या मुलीसोबत पिडीत बालिकेला शेतात नेले. सकाळी १० च्या सुमारास शेतात जावून या तिघांनी ज्वारी कापली. दुपारी  पिडीता व आरोपीच्या मुलीने जेवणही केले. त्यानंतर पिण्याचे पाणी संपल्याने आरोपीने त्याच्या मुलीला पाणी आणण्यास पाठवून पिडितेला ज्वारी काप असे सांगितले. त्यानुसार पिडीता पुन्हा ज्वारी कापत असताना जवळ बोलावून  तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, याघटनेनंतर घाबरलेली पिडीता पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, आरोपीने तिला पकडून जमिनीवर आपटले व तिच्यावर अत्याचार केला.  तसेच सदर घटना कोणाला सांगितली तर तुझ्या कुटुंबाला जीवे मारतो, अशी  धमकीही दिली. 
त्यामुळे पिडित बालिका या प्रकाराबाबत कोणालाही बोलली नाही. अखेर ही बाब तिच्या घरच्यांच्या लक्षात  आल्यानंतर बुधवारी १३ मे रोजी  या घटनेबाबत कुंटूर पोलिसात फिर्याद देण्यात आली. त्यावरुन आरोपी सोनाजी हनमंते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक  तपास सपोनि करीम पठाण यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार अशोक दामोदर, पोकाँ भार्गव सुवर्णकार, संतोष आऊलवार, शंकर बुद्देवाड तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! Rape on girl by showing the lure of sorghum in Nanded District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.