धक्कादायक ! करणीच्या संशयातून तिघांचे हात घातले उकळत्या तेलात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 07:30 PM2019-09-02T19:30:43+5:302019-09-02T19:32:17+5:30

मांत्रिक पत्नीसह फरार

Shocking! The trio's hands were put in boiling oil over suspicion of karani | धक्कादायक ! करणीच्या संशयातून तिघांचे हात घातले उकळत्या तेलात 

धक्कादायक ! करणीच्या संशयातून तिघांचे हात घातले उकळत्या तेलात 

Next
ठळक मुद्देजखमींवर नांदेड येथे उपचार सुरु

नांदेड : एकीकडे भारत देश चंद्रावर जात आहे पण आजही देशात अंधश्रद्धेला लोक बळी पडत असल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे...जिल्ह्यातील पिंपळगाव येथे अंधश्रद्धेतुन दोन किशोरवयीन आणि एका प्रौढ व्यक्तीचे उकळत्या तेलात हात घालून बाहेर काढल्याने या तिघांचे उजवे हात गंभिर भाजले आहेत. या प्रकरणातील पिंपळगाव ( कु ) येथील मांत्रीक पत्नीसह फरार झाला आहे.

पिडीतांनी दिलेल्या माहितीनुसार बिलोली तालुक्यातील पिंपळगाव येथील लक्ष्मण जाधव ,राम जाधव,कांताबाई जाधव यांनी संगनमत करून गावातील बिरू शिरगिरे, संतोष हमारे, आणि गंगाधर उरेकर यांना बोलवून पंधरा दिवसापूर्वी आमच्या मुलाचा मृत्यू कसा झाला अशी विचारणा केली...त्या वेळी या तिघांनीं आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले...लक्ष्मण जाधव महाराज यांनी तुम्ही मुलाला मारल्याचा आरोप केला...जर मुलाला तुम्ही मारले नाही तर गरम तेलाच्या कढईत हात घाला. तुम्ही मारले असेल तर तुमचा हात भाजेल आणि मारले नसेल तर तुमचा हात भाजणार नाही, असे म्हणत या तिघांचे हात उकळत्या तेलात हात घातले.

यात दोन किशोरवयीन बिरू आणि संतोषसह एका प्रौढ असलेल्या गंगाधर यांचे हात गंभीर भाजल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...या प्रकरणी बिरू शिरगिरे यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण जाधव ,राम जाधव,कांताबाई जाधव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Shocking! The trio's hands were put in boiling oil over suspicion of karani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.