गरिबांनी झोपडीतच राहावे काय? पक्क्या घराचे स्वप्न लटकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:22+5:302021-07-22T04:13:22+5:30
नांदेड : शहरात प्रधानमंत्री आवास शहरी योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम केले जात आहे. १३ टप्प्यांत ९ ...
नांदेड : शहरात प्रधानमंत्री आवास शहरी योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम केले जात आहे. १३ टप्प्यांत ९ हजार ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्याने घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यातही प्रामुख्याने केंद्र शासनाचे या योजनेसाठी ११३ कोटी ८७ लाख रुपये थकविले आहेत.
मोफत वाळू मिळेना, साहित्यही महागले !
घरकुलांसाठी वाळू आवश्यक आहे. घरकुलांसाठी मोफत वाळू देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांवर वाळू सोन्याच्या भावाने खरेदी करावी लागत आहे. अनेकांची कामे रखडली आहेत.
शहरी भागात घरकुलासाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारे अनुदान यांत आता जमीन-अस्मानाचा फरक आहे. अडीच लाखांत घर उभारावे कसे?
- राजेंद्र कांबळे, नांदेड
पंतप्रधान आवास योजनेचे ११ टप्पे मंजूर झाले आहेत. राज्य शासनाचा संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे; परंतु केंद्राच्या निधीची प्रतीक्षा आहे. निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
- माधव बाशेट्टी,
कार्यकारी अभियंता
योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत. मात्र तीन टप्प्यांत रक्कम दिली जात आहे. त्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. निधीअभावी घराचे काम रखडले आहे. घराचे काम कधी पूर्ण होईल? हाच प्रश्न आहे.
- शेख रिजवान, नांदेड