मोहनपुरा येथे श्री दत्तनाम सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:55+5:302020-12-23T04:14:55+5:30
पहाटे ४ ते ५ काकडा , सकाळी ७ ते ११ बालक्रीडा पारायण, दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा ...
पहाटे ४ ते ५ काकडा , सकाळी ७ ते ११ बालक्रीडा पारायण, दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा -भागवत कथाकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देशमुख झाडगावकर. लगेच महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ९ श्री दत्त महाराजांची महापूजा व रात्री ९ ते ११ दत्तनामी कीर्तन होणार आहे. रोजची कीर्तने रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहेत.
२३ रोजी ह.भ.प.कृष्णा महाराज राजुरकर, २४ रोजी ह.भ.प.संतोष पुरी महाराज चोळाखा, २५ रोजी ह.भ.प.शहादत्त महाराज कोलंबी, २६ रोजी १०-३५ वाजता जीर्णाेद्धार भूमिपुजन सोहळा श्री महंत जीवन दासजी महाराज भोपाळ, श्री महंत ईश्वर भारती महाराज हिवरा व श्री ज्ञान भारती महाराज देळब व श्यामगीर महाराज हारबळ यांच्या हस्ते होणार आहे व रात्री ह.भ.प. बळवंत माणिक महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
२७ रोजी ह.भ.प.साईनाथ महाराज बळीरामपुर, २८ रोजी ह.भ.प.बालाजी महाराज कवठेकर यांची दत्तनामी कीर्तन होतील. २९ रोजी सकाळी ११ ते १ दत्त उत्सव कीर्तन ह.भ.प.रमेश महाराज माउलीकर यांचे होईल. लगेच महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ६ ते १० महापूजा, ३० रोज बुधवारी सकाळी ७ वा.श्री दत्त महाराजांची पालखी मिरवणूक सोहळा. व रात्री ८ ते ११ सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीपाल महाराज आनंजगाव यांचा कार्यक्रम होणार आहे.
यावर्षी कोरोना महामारीमुळे पशू प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, जंगी कुस्ती असे इतर कार्यक्रम होणार नाहीत. तरी भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा श्रीमद् भागवत व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे या आवाहन संस्थानचे मठाधीपती श्री महंत १००८ राम भारती गुरु मारोती भारती व मोहनपुरा व वाहेगाव येथील गावकरी यांनी केले आहे.