श्रीरामनवमी साधेपणाने साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:07+5:302021-04-21T04:18:07+5:30

कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आप आपल्‍या घरी श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करावा. कोविड-१९ ...

Shri Ram Navami should be celebrated simply | श्रीरामनवमी साधेपणाने साजरी करावी

श्रीरामनवमी साधेपणाने साजरी करावी

googlenewsNext

कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आप आपल्‍या घरी श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्‍थळे बंद ठेवण्‍यात आली असल्‍याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्‍यादींचे किंवा कोणत्‍याही प्रकारे धार्मिक, सांस्‍कृतिक अ‍थवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्‍यात येऊ नये.

मंदिरामधील व्‍यवस्‍थापक, विश्‍वस्‍त यांनी शक्‍य असल्‍यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साईट व फेसबुक इत्‍यादी द्वारे उपलब्‍ध करून द्यावी. श्रीरामनवमीच्‍या उत्‍सवानिमित्‍त कोणत्‍याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत, शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी , कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Shri Ram Navami should be celebrated simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.