श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे मानकरी दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:49 AM2018-12-15T00:49:52+5:302018-12-15T00:50:10+5:30
दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.
कंधार : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.
दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगावची खंडोबा यात्रा आपल्या खास वैशिष्ट्याने उत्तर भारतातील भाविक - भक्तांचे आकर्षण ठरले आहे. उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी आपला घोडेबाजार आता सर्वांना आकर्षण वाटणारा निर्माण केला आहे. पूर्वीचे यात्रेचे स्वरूप आता कालौघात बदलले आहे. महिनाभरची यात्रा मोजक्या दिवसांवर आली. परंतु, यात्रेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाने कलावंत, भाविक, शेतकरी, शेतमजूर, भटके विमुक्त आदींसाठी नानाविध कार्यक्रम एक मेजवाणी ठरते.
यात्रा परिसर, मंदिर परिसर, धर्मशाळा, पालखी रस्ता, पशुधन शेड, सभामंडप, वाहनतळ, भोजनगृह आदींची सोयी झाली आहे. माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांनी विकासासाठी मोठा निधी दिला. त्यामुळे अनेक कामे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधी उपलब्ध करून दिला. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा केला. यात्रा विकासासाठी प्रयत्न केले. या कामात मात्र मानकरी दुर्लक्षित राहिले, अशीच परिस्थिती आहे.
यात्रेची सुरूवात करणारे, पागोटे (मुंडासे) मुख्य पालखीत ठेवल्या शिवाय पालखी मिरवणूक निघत नाही. सट व देवस्वारी या दोन्हीवेळी पानभोसीच्या भोसीकर कुटुंबाचा ‘मुंडासेमान’ असतो. आणि नवीन मुंडासे वस्त्र कुरूळा येथील महाजन आणतात. छत्रीचे मानकरी शिराढोण येथील पांडागळे हे आहेत. मुख्य पालखीसमोरची पालखी मानकरी हे रिसनगावचे नाईक आहेत. या मानकºयाशिवाय यात्रा अपूर्ण आहे. परंतु, या मानकºयांना माळेगावात अद्याप पक्का निवारा उपलब्ध करून देता आला नाही. स्वत: व गावातील सोबत आलेल्या भाविक - भक्तांना राहुटीत गारठ्यात रात्र काढावी लागते. पदरमोड करून गावकºयांना दिलासा द्यावा लागतो. कोटीचा खर्च, विविध बांधकामे होत असताना मानकरी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे. मात्र आजपर्यंत तसे झाले नाही. आता रिसनगावच्या नाईकांना २५ लाखांतून सभागृह बांधून दिले जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. इतर तीन मानकºयांना असा योग कधी येणार? असा सवाल मानक-यांच्या गावातून व भाविक - भक्तांतून केला जात आहे.
पक्का निवारा नसल्याने मानक-यांची परवड
मुंडासे (पागोटे), पूजा अर्चा, अभिषेक आदींचा मान अनेक पिढीपासून कुटुंबाकडे आहे. यात्राकाळात गावकºयांसोबत शेकडो जण असतात. परंतु, निवारा पक्का नसल्याने त्रास होतो. खर्च पदरमोड करावा लागतो. आता सततच्या दुष्काळाने आर्थिक ताण सहन होत नाही. निवारा व खर्च तरतूद केली तर सोयीचे होईल - खुशालराव भगवानराव पा.भोसीकर, पानभोसी ता.कंधार
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मानक-यांना निवारा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. रिसनगावच्या नाईक यांना मुख्यमंत्री निधीतून २५ लाखांचे सभागृह मंजूर झाले आहे. इतर मानकºयांना तशी सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा निवेदनाद्वारे करणार आहे -विजय वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य, माळेगाव, ता.लोहा)