कोरोनामुळे उष्माघाताचे दुष्परिणामही दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:08+5:302021-05-19T04:18:08+5:30

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयावह होती. मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना संकटात एप्रिलमध्ये रुग्ण संख्या शिगेला पोहचली होती. मृत्यू संख्याही ...

The side effects of heatstroke due to corona are also ignored | कोरोनामुळे उष्माघाताचे दुष्परिणामही दुर्लक्षित

कोरोनामुळे उष्माघाताचे दुष्परिणामही दुर्लक्षित

Next

कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयावह होती. मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना संकटात एप्रिलमध्ये रुग्ण संख्या शिगेला पोहचली होती. मृत्यू संख्याही मोठी होती. त्यामुळे कोरोना संकटाचाच विचार प्रत्येकाच्या मनात होता. यात फिजीकल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. गतवर्षीही मार्चमध्येच कोरोनाला प्रारंभ झाला अन् नागरिक घरात बंद झाले. त्यामुळे उष्माघाताचे परिणाम जाणवले नाहीत. कोरोना उपचारात व्यस्त असलेल्या आरोग्य यंत्रणेलाही केवळ आवाहनाव्यतिरिक्त काही करता आले नाही. उष्माघाताचे रुग्णही आढळले नाहीत.

चौकट ---

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या अतिशय वेगात वाढली. त्याचवेळी बळीही त्याच वेगात गेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवला नाही.

चौकट ----

जिल्ह्यात सर्वाधिक तापमान हे ४४ अंशापर्यंत पोहचले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३९ अंश सेल्सीअस तापमान होते. त्यात मे मध्ये वाढ झाली. मे मध्ये वादळी वारे व पावसाचे प्रमाण अधिक राहिले. तौक्ते चक्री वादळाचा परिणाम जिल्ह्यावर झाला. तापमानात घट झाली.

कोट ---

यंदा तापमानात वाढ कमी-अधिक होत असली तरी कोरोना संकटामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना सूचना केल्या होत्या. आरोग्य विभाग अशा रुग्णावर उपचार करण्यासाठी तयार आहे -डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.

Web Title: The side effects of heatstroke due to corona are also ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.