सकल मराठा समाजाचे आज मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:22 AM2021-08-20T04:22:56+5:302021-08-20T04:22:56+5:30
चौकट- आंदोलनाची आचारसंहिता आंदोलनात काळ्या रंगाची वेशभूषा करून दंडावर काळी फीत बांधण्यात यावी. तसेच काळा मास्क वापरावा. पावसाची शक्यता ...
चौकट- आंदोलनाची आचारसंहिता
आंदोलनात काळ्या रंगाची वेशभूषा करून दंडावर काळी फीत बांधण्यात यावी. तसेच काळा मास्क वापरावा. पावसाची शक्यता लक्षात घेऊन सोबत छत्री, सॅनिटायझर ठेवावे. आंदोलनस्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक मार्गात केला बदल
सकाळी १० वाजता हे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वजिराबादकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. त्यात वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळ्याच्या पुढे कडक चहाच्या दुकानापासून पुतळ्यापर्यंत, रेल्वे स्टेशन चौक ते पुतळा, न्यायालयाच्या बाजूने येणारा रस्ता, जिल्हा परिषदेच्या बाजूने येणारा रस्ता बंद राहणार आहे, तर वजिराबाद चौक ते रेल्वे स्टेशन जाण्यासाठी कलामंदिरजवळील बिकानेरपासूनच्या रस्त्याचा वापर करावा. वजिराबाद चौक ते जुना मोंढा हा रस्ता दोन्ही बाजूने वापरता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी वजिराबाद चौक ते गांधी पुतळा आणि जिल्हा परिषदेसाठी डॉक्टर लेन मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.