परिस्थिती पुढे हतबल; बालशौर्य पुरस्कारप्राप्त नदाफवर मोलमजुरीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 06:50 PM2020-08-21T18:50:01+5:302020-08-21T18:53:24+5:30

शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने मोलमजुरी करून पैसे जमा करून शिक्षण घेण्याची इच्छा

The situation continues to worsen; Time of wage labor on Nadaf, a child hero award winner | परिस्थिती पुढे हतबल; बालशौर्य पुरस्कारप्राप्त नदाफवर मोलमजुरीची वेळ

परिस्थिती पुढे हतबल; बालशौर्य पुरस्कारप्राप्त नदाफवर मोलमजुरीची वेळ

Next
ठळक मुद्देबाल शौर्य विजेता एजाज नदाफने दहावीत ६० .०० टक्के उत्तीर्ण झाला होता. बारावी उत्तीर्ण झाल्यावर पोलिस किंवा आर्मीत जाण्याची इच्छा आहे

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील बाल शौर्य विजेता एजाज नदाफ सध्या मोलमजुरीचे काम करीत आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने त्याला यावर्षी १२ वीची परीक्षा सुद्धा देता आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बाल शौर्य विजेता एजाज नदाफच्या घराची परिस्थिती हालाखाची असून आई वडील मोलमजुरी करून एजाज नदाफला शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत परंतु शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांच्या झेपत नसल्याने एजाज नदाफने शिक्षण अर्धवट सोडून केळीच्या गाड्या भरण्याचे काम करीत आहे मात्र एजाज नदाफचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. परंतु शिक्षणासाठी लागणारा खर्च झेपत नसल्याने मोलमजुरी करून पैसे जमा करून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे .

बाल शौर्य विजेता एजाज नदाफने दहावीत ६० .०० टक्के उत्तीर्ण झाला होता. नांदेड येथील कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. मात्र नांदेड येथे शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा कमी पडत असल्याने त्याने बारावीला डोगरकडा येथील कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र त्याला बारावीची परीक्षा देता आली नाही. यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी पैशाची व मार्गदर्शनाची गरज आहे.

पार्डी ( म ) येथील गावाच्या शेजारी वाहणाऱ्या नदीतील बंधाऱ्यात चार महिला कपडे धुण्यासाठी गेल्या असता एक महिला पाय घसरून पडली असता तिला वाचविण्यासाठी दुसऱ्या मुलींनी पाण्यात उडी मारली मात्र तीही पाण्यात बुडत असताना तिसऱ्या मुलींनी आरडाओरडा केल्याने एजाज नदाफ यांनी जिवाची पर्वा न करता दोन मुलीचा जावं वाचविला होता. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१८ रोजी  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

पोलीस किंवा सैन्यात जाण्याची इच्छा
बारावी उत्तीर्ण झाल्यावर पोलिस किंवा आर्मीत जाण्याची तयारी आहे यासाठी बारावी उत्तीर्ण होण्याची गरज आहे मात्र नांदेड येथे शिक्षणासाठी जास्त पैसे लागत असल्याने कला शाखेत प्रवेश घेतला आहे बारावी पास झाल्यावर पोलीस किंवा आमीर्ची तयारी करणार आहे़           
- बाल शौर्य पुरस्कार एजाज नदाफ

Web Title: The situation continues to worsen; Time of wage labor on Nadaf, a child hero award winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.