नांदेड विभागातून नव्याने सहा गाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:18 AM2021-04-01T04:18:56+5:302021-04-01T04:18:56+5:30

नांदेड विभागाने कळविल्यानुसार नांदेड ते निझामुद्दीन (०२७५३) विशेष एक्स्प्रेस ६ एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी ९ वाजता सुटेल. ...

Six new trains will run from Nanded division | नांदेड विभागातून नव्याने सहा गाड्या धावणार

नांदेड विभागातून नव्याने सहा गाड्या धावणार

googlenewsNext

नांदेड विभागाने कळविल्यानुसार नांदेड ते निझामुद्दीन (०२७५३) विशेष एक्स्प्रेस ६ एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी ९ वाजता सुटेल. सदर गाडी औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रामार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पोहोचेल.

निझामुद्दीन ते नांदेड (०२७५४) विशेष एक्स्प्रेस ७ एप्रिलपासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री १०.४० वाजता सुटून आग्रा, झांसी, भोपाळ, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे रात्री १२.३५ वाजता पोहोचेल. आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्स्प्रेस (०७४०९) १ एप्रिलपासून आदिलाबाद येथून सकाळी ८ वाजता सुटेल आणि किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे ११.५५ वाजता पोहोचेल. नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस (०७४१०) १ एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी ३.०५ वाजता सुटेल आणि भोकर, हिमायतनगर, किनवटमार्गे आदिलाबाद येथे सायंकाळी ६.५५ वाजता पोहोचेल. नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६१९) २ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि परभणीमार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी ०४.५० वाजता पोहोचेल.

औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२०) ५ एप्रिलपासून नांदेड येथून रात्री ०१.०५ वाजता सुटेल आणि परभणीमार्गे नांदेड येथे सकाळी ०६.१५ वाजता पोहोचेल.

औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२१) २ एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री ८.५० वाजता सुटेल आणि परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकलमार्गे रेनीगुंटा येथे सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२२) ३ एप्रिलपासून रेनीगुंटा येथून रात्री ९.२५ वाजता सुटेल आणि गुंटकल, रेचूर, विकाराबाद, परभणीमार्गे औरंगाबाद येथे रात्री १०.१५ वाजता पोहोचेल.

नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०२७६७) ५ एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल आणि किनवट, नागपूर, रायपूर, बिलासपूर, चक्रधरपूर, खरगपूरमार्गे सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.२० वाजता पोहोचेल.

सत्रागच्ची ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०२७६८) ७ एप्रिलपासून सत्रागच्ची (कोलकता) येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल आणि खरगपूर, चक्रधरपूर, बिलासपूर, रायपूर, नागपूर, किनवटमार्गे दुसऱ्या दिवशी नांदेड येथे सायंकाळी ७.१० वाजता पोहोचेल.

नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२३) १ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ६.५० वाजता सुटेल आणि वसमत हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबुरोड, जोधपूर, बिकानेरमार्गे श्री गंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ७.२० वाजता पोहोचेल.

श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२४) ३ एप्रिलपासून श्री गंगानगर येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि बिकानेर जोधपूर, अबुरोड, अहेमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमतमार्गे नांदेड येथे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रात्री २.३० वाजता पोहोचेल.

Web Title: Six new trains will run from Nanded division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.