व्यापाऱ्याला ६ जणांनी लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:07 AM2019-06-19T00:07:07+5:302019-06-19T00:08:42+5:30
बोधडी ते हिमायतनगर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चालकाशी वाद घालत चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या़ त्यानंतर वाहनातील सव्वालाख रुपये रोख आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे़
नांदेड : बोधडी ते हिमायतनगर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चालकाशी वाद घालत चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या़ त्यानंतर वाहनातील सव्वालाख रुपये रोख आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे़
यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकीचे अनिल अशोक गडपेवार हे आपल्या एका साथीदारासह किराणा मालाची वसुली करण्यासाठी किनवट तालुक्यात गेले होते़ यावेळी सोबत त्यांनी वाहनात काही किराणा मालही घेतला होता़ वसुलीचे पैसे घेवून ते आयचरने ढाणकीकडे परत निघाले होते़
यावेळी रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या टोळीने गडपेवार यांचे वाहन दिसताच त्यावर दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनाची काच फुटली़ यावेळी गडपेवार हे गाडी थांबवून खाली उतरले़ दगडफेक करणाऱ्यांना जाब विचारत असताना, दबा धरुन बसलेले इतर पाच जण त्या ठिकाणी आले़ त्यांनी गडपेवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़
यावेळी गाडीतील रोख सव्वा लाख रुपये आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ यावेळी चार चोरट्यांनी पांढºया रंगाच्या कारमधून तर दोघांनी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन पळ काढला़ अनिल गडपेवार यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास सपोनि व्ही़ डी़ कांबळे हे करीत आहेत़
शेतीच्या कारणावरुन कु-हाडीने मारहाण
लोहा तालुक्यातील आसूर शिवारात १५ जून रोजी शेतीच्या कारणावरुन एकाच्या डोक्यात कु-हाडीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
ज्योती कैलास पुरी यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे़ कैलास पुरी हे १५ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आसूर शिवारातील शेतात होते़ त्यावेळी या ठिकाणी काही जण आले़ यावेळी त्यांनी कैलास पुरी यांच्याशी वाद घालत त्यांच्या डोक्यात कुºहाडीने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच त्यांच्या खिशातील रोख १९ हजार रुपये व ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले़ याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़