सोशल मीडियावर प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या ६० अल्पवयीन मुलींनी सोडले आई-बाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:13+5:302021-08-29T04:20:13+5:30
चौकट- प्रेमप्रकरण, प्रेमभंग, कौटुंबिक, मानसिक तणाव, पालकांमधील मतभेद, पालकांकडून न मिळणारे प्रेम, अभ्यासाचा ताणतणाव आदी कारणे मुलांना घर सोडण्यास ...
चौकट- प्रेमप्रकरण, प्रेमभंग, कौटुंबिक, मानसिक तणाव, पालकांमधील मतभेद, पालकांकडून न मिळणारे प्रेम, अभ्यासाचा ताणतणाव आदी कारणे मुलांना घर सोडण्यास बाध्य करतात. त्याचबरोबर लग्नाचे आमिषही कारणीभूत आहे. मुलांकडूनही ऑनलाईनच्या नावाखाली माेबाईलचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे आपली मुले, मुली नेमके काय करीत आहेत याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मुलांची विचार करण्याची बदलते पद्धत
वयात येत असताना मुला-मुलींच्या हार्मेान्समध्ये बदल होतात. त्याचबरोबर त्यांची विचार करण्याची, वागण्याची, बोलण्याची पद्धत बदलत असते. सोशल मीडियावर दिसत असलेल्या प्रत्येक गोष्टीसोबत ते आपला संबंध जोडून पाहतात, तसेच या वयात एकमेकांबद्दलही आकर्षण असते. काहीतरी नवीन करण्याची खुमखुमी असते. त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी समुपदेशकांचीही मदत घ्यावी.
डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ.