जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:46+5:302021-06-10T04:13:46+5:30

जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मन्याड, लेंडी यासारख्या मोठ्या नद्या व इतर लहान नद्या वाहतात. सिंचन सुविधेच्यादृष्टीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान, ...

Sludge from 94 lakes in the district in farmers' fields | जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात

जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात

googlenewsNext

जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मन्याड, लेंडी यासारख्या मोठ्या नद्या व इतर लहान नद्या वाहतात. सिंचन सुविधेच्यादृष्टीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान, मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. पावसाच्या असमतोलनामुळे जिल्ह्यातील काही धरणे ही कोरडी झाली आहेत. हे लक्षात घेता, त्यातील गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा जल व मृदसंधारण विभागाकडे १६ तलाव असून, त्यामध्ये ४२ हजार ६७ घनमीटर गाळ आहे. हा काढण्यासाठी २० दिवसात गाळ काढणे व शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार याद्या व इतर नियोजन केले होते. या कामासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेतला जात असून, यात संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, अनुलोम, आदी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत १२ तालुक्यांतील ४८ गाव, पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यातून सुमारे ३. ३५ घनमीटर गाळ काढण्यात आलेला असून, हा सुपीक गाळ २७१.२० हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आलेला आहे.

Web Title: Sludge from 94 lakes in the district in farmers' fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.