...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:07 AM2020-01-28T05:07:59+5:302020-01-28T05:10:07+5:30
नांदेड : अनेकांना अजूनही वाटते काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित कसे आले. आलो आम्ही एकत्रित, कारण ...
नांदेड : अनेकांना अजूनही वाटते काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित कसे आले. आलो आम्ही एकत्रित, कारण हल्लीचा जमाना मल्टीस्टारचा आहे. चित्रपटात तीन-तीन हिरो पाहिजेत त्याप्रमाणेच तीन विचारांच्या तीन पक्षांचे सरकार आले. मात्र, हे सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करणार आहे. तशी स्पष्ट कल्पना काँग्रेसने शिवसेनेला दिली आहे. एवढेच नव्हे, तर शिवसेनेकडून तसे लिहून घेतले आहे. ज्या दिवशी हे सरकार घटनेच्या चौकटीबाहेर जाईल त्यादिवशी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.
नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले, सरकार स्थापनेच्यावेळी आम्ही दिल्लीत आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालले पाहिजे.
त्याच्या पलीकडे जाता येणार नाही आणि तसे झाले तर सरकारमधून बाहेर पडायचे.
सोनिया गांधी यांचे म्हणणे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यांच्या होकारानंतरच सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे आमचे महाआघाडीचे हे सरकार घटनेप्रमाणेच काम
करेल.
कोणताही लेखी करार नाही
शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रम ठरविला असून त्यावर सर्वांच्या सह्या आहेत. याशिवाय कोणताही लेखी करार झालेला नाही.
हा तर हॉरर सिनेमा
अशोक चव्हाण यांच्या ‘राज्यातील सरकार हे मल्टीस्टारर सिनेमा’ या वक्तव्यााचा फडणवीस यांनी समाचार घेतला़ हा मल्टीस्टार सिनेमा नसून हॉरर सिनेमा आहे़
तो किती दिवस पहायचा हे
जनताच ठरवील़ परंतु हा हॉरर सिनेमा लवकरच बंद होणार, असेही ते म्हणाले़