कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या गहू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:50+5:302021-09-08T04:23:50+5:30
लहान मुलांनी पोटात काय गिळले हे त्याची प्रकृती बिघडल्यानंतर कळते. त्यात पिनकाटे गिळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या पाठोपाठ नाकात ...
लहान मुलांनी पोटात काय गिळले हे त्याची प्रकृती बिघडल्यानंतर कळते. त्यात पिनकाटे गिळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या पाठोपाठ नाकात शेंगदाणा, ज्वारीचे दाणा, फुलाची पाकळी अडकण्याचेही प्रकार आहेत. त्याचबरोबर टाचण पीनदेखील अडकल्याच्या घटना पोटविकार तज्ज्ञांकडे पहायला मिळल्या.
मुले काय करतील याचा नेम नाही
शहरातील एका मुलाने कागदे जोडण्यासाठी वापरण्यात येणारी पिन गिळली होती.
पोटाचा त्रास होऊ लागल्याने सदर मुलाला डॉक्टरांकडे नेले असता हा प्रकार पुढे आला.
अशाचप्रकारे भोकरमधील एका मुलीने डोक्याला लावण्याची पीन गिळली होती.
ती दुर्बिणच्या साहाय्याने डॉक्टरांकडून काढण्यात आली.
लहान मुलं रांगायला लागली की हातात पडेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे त्यांच्या हातात हातमोजे घालावेत, घरात त्यांनी खाली सोडताना स्वच्छ जागेवर साेडावे.
घरातील एखाद्या व्यक्तीने लहान मुलांच्या कृत्यावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
एखादा प्रकार जीवावरही बेतू शकतो, त्यामुळे काळजी महत्वाची.
कोणतीही घटना ही व्यक्तीच्या चुकीमुळे होते. त्यामुळे काळजी आणि योग्य ती खबरदारी घेणेचे गरजेचे आहे. अनेक रूग्ण मी केवळ तोंडात कॉईन, टाचणी, पीन पकडली. परंतु, ती कशी आत गेली लक्षात आले नाही, असे सांगतात. परंतु, या वस्तू तोंडात पकडण्याचा वा घालण्याच्या नसतात. त्यामुळे लहान मुले असो की मोठ्या व्यक्ती प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. एम. कल्याणकर, नांदेड