सोनाली लोकडे यांना पीएच.डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:12+5:302021-01-13T04:44:12+5:30

एकाची आत्महत्या हिमायतनगर - तालुक्यातील सिरंजनी येथील बालाजी तुकाराम सुरोशे (वय १८) यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

Sonali Lokade has a Ph.D. | सोनाली लोकडे यांना पीएच.डी.

सोनाली लोकडे यांना पीएच.डी.

Next

एकाची आत्महत्या

हिमायतनगर - तालुक्यातील सिरंजनी येथील बालाजी तुकाराम सुरोशे (वय १८) यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. हिमायतनगर पोलिसांनी व्ही. एन. घोडके यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपास ठाकरे करीत आहेत.

वक्तृत्व स्पर्धा

बिलोली- महिला शिक्षक दिनानिमित्त बिलोली पंचायत समिती शिक्षण विभाग गटसाधन केंद्रातर्फे गटशिक्षणाधिकारी दिगंबर तोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात चिरली येथील नीता दरबस्तेवार-प्रथम, एस. डी. देशपांडे द्वितीय, अश्विनी कोतावाड, तृतीय आल्या. एकांकिका स्पर्धेत के. टी. मुळावकर, प्रथम, शोभा तोटावार, द्वितीय, शिवकन्या पटवे, तृतीय आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सागरबाई भैरवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाय. एस. कऊटकर, गुणवंत राठोड उपस्थित होते.

पवळे यांना पदोन्नती

कंधार - येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन आर. एन. पवळे यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळून त्यांची पदस्थापना बीड येथील तहसील कार्यालयात रोहयो विभागात झाली आहे. पवळे हे मागील पाच वर्षांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन म्हणून कार्यरत होते. या पदोन्नतीबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.

नीता दरबस्तेवार प्रथम

कुंडलवाडी- गटशिक्षणाधिकारी कार्यालय बिलोलीच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुंडलवाडी केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळा, चिरली येथील सहशिक्षिका नीता दरबस्तेवार (दमकोंडवार) प्रथम आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा तोटावार, शिवकन्या पटवे यांनी केले. विषयतज्ज्ञ हलगरे यांनी आभार मानले.

शालेय पोषण आहार वाटप

लोहा- सुगाव (ता. लोहा) येथे जि. प. कें. प्रा. शाळा येथे शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जी. एस. मंगनाळे, जयराम पाटील आदी उपस्थित होते. पहिली ते पाचवी व सहावी ते सातवीमधील विद्यार्थ्यांना पोषण आहारातील तांदूळ, हरभरा, मूगडाळ आदींचे वाटप करण्यात आले.

बदने यांना पदोन्नती

मुखेड- ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ. रामकृष्ण बदने यांना प्रोफेसरपदी पदोन्नती मिळाली. बदने हे मागील २८ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी अद्यापनाबरोबर प्रशासकीय जबाबदारीही सांभाळली आहे.

गडकरी यांची भेट

किनवट- आ. भीमराव केराम यांनी नागपूर येथे ९ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात भोकर ते धनोडा मार्ग क्र. १६१ चे मजबुतीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भाजप उपाध्यक्ष अनिल तिरमनवार व अन्य उपस्थित होते.

Web Title: Sonali Lokade has a Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.